Astro-newToday Rashi Bhavishya, 22 September 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष (Aries Horoscope Today ):-

आत्मविश्वास बाळगून काम करा. नातेवाईकांशी व्यवहाराने वागा. आज दिनक्रम व्यस्त राहील. मनाचा तोल सांभाळावा. समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून जाईल.

वृषभ (Taurus Horoscope Today ):-

इतरांकडून स्तुति केली जाईल. सतत काम करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगा. ग्रहमानाची साथ मिळेल. आजचा दिवस शुभ राहील. धनसंचय वाढीस लागेल.

मिथुन (Gemini Horoscope Today ):-

वागणे आणि बोलणे यांचा मेळ साधावा. दिवस धावपळीत जाईल. मात्र नियोजित काम पूर्ण होईल असे नाही. प्रवास संभवतो. खर्चात वाढ होण्याची शक्यता.

कर्क (Cancer Horoscope Today ):-

विद्यार्थ्यांना चांगला काळ आहे. घरातील कामात अडकून पडाल. रचनात्मक कामात आनंद मिळेल. व्यक्तिमत्व विकास वृद्धिंगत होईल. मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल.

सिंह (Leo Horoscope Today ):-

आपल्या चांगुलपणाला तडा जाऊ देऊ नका. मनातील इच्छेला अधिक महत्व द्यावे. कार्यक्षेत्रात उत्तम कामकाज कराल. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस. प्रामाणिकपणे काम करण्यावर भर द्याल.

कन्या (Virgo Horoscope Today ):-

आळस बाजूला सारावा लागेल. आपल्यातील कला जोपासा. कामाचा अधिक ताण जाणवेल. धार्मिक गोष्टीत मन रमेल. वादाचे प्रसंग टाळावेत.

तूळ (Libra Horoscope Today ):-

हातातील काम मनापासून करावे. कामातून चांगले समाधान मिळेल. आपण घेत असलेल्या मेहनतीला योग्य फळ मिळेल. आनंदाची अनुभूति घ्याल. मित्राचा सल्ला मोलाचा ठरेल.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):-

आहारातील पथ्य पाळा. अंत:करणापासून समोरच्याला मदत करा. प्रेम संबंधातील ओलावा वाढेल. नातेवाईक मदतीला येतील. जुने मित्र बरेच दिवसांनी भेटण्याचा योग.

धनू (Sagittarius Horoscope Today ):-

आज आखलेले काम सुरळीत पार पडेल. जास्त काळजी करू नये. स्पर्धा परीक्षेसंदर्भात सकारात्मक वार्ता मिळेल. मित्राने दिलेली शुभ वार्ता मन प्रसन्न करेल. समस्येचे निराकरण होईल.

मकर (Capricorn Horoscope Today ):-

उगाचच कोणाची खोडी काढू नका. कामाचा व्याप वाढता राहील. जवळचा प्रवास करावा लागेल. कामाच्या बाबतीत गाफिल राहू नका. विस्कळीत कामाची घडी नीट बसवावी.

कुंभ (Aquarius Horoscope Today ):-

फसव्या लोकांपासून सावध रहा. स्वत:च्या जबाबदारीवर निर्णय घ्या. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. मित्राची योग्य साथ लाभेल. विरोधक पराभूत होतील.

मीन (Pisces Horoscope Today ):-

व्यावसायिक प्रगती साधता येईल. मनोकामना पूर्ण करणारा दिवस. अति तिखट पदार्थ खाणे टाळावे. धार्मिक कामातील गोडी वाढेल. कुटुंबासाठी देखील वेळ काढावा.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: