Astro new


Today Rashi Bhavishya, 15 November 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

प्रयत्नांची कास सोडू नये. मिळकत व खर्च यांचे संतुलन ठेवावे. आपली स्वप्ने पूर्णत्वास जातील. रोजगाराच्या क्षेत्रात यश मिळेल. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करावा.

वृषभ:-

लहान प्रवास संभवतात. जमिनीच्या कामातून लाभ होईल. मनातील नकारात्मक विचार काढून टाका. कष्टाशिवाय काही हाती लागणार नाही. यात्रा सुखकर होईल.

मिथुन:-

प्रलंबित कामे मार्गी लागतील. शेजार्‍यांचे सहकार्य मिळेल. दिवस उत्तम फलदायी असेल. आर्थिक बाबतीचे प्रयत्न यश देतील. तज्ञ व्यक्तींची भेट होईल.

कर्क:-

आहारावर नियंत्रण ठेवावे. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. वरिष्ठांना नाराज करू नका. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेऊ नका. वाणीत माधुर्य जपावे.

सिंह:-

कामातील समस्या दूर कराव्या लागतील. प्रवासात काळजी घ्यावी. हातापायांना इजा संभवते. वैचारिक स्थिरता ठेवावी. आपले छंद जोपासावेत.

कन्या:-

विरोधकांच्या करवायला कमी होतील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात मान वाढेल. मनाप्रमाणे गोष्टी घडतील. संपर्कातील लोकांशी जवळीक वाढेल.

तूळ:-

धनलाभाचे योग संभवतात. नवीन काम सुरू करू शकता. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. एखादी मौल्यवान वस्तु मिळेल. विरोधक पराभूत होतील.

वृश्चिक:-

व्यावसायिक योजनांना बळ मिळेल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. कामाचा ताण जाणवेल. उगाच चिडचिड करू नये. जोखमीचे पाऊल उचलताना सारासार विचार करावा.

धनू:-

स्पर्धेत यश मिळेल.  भावंडांचे सहकार्य मोलाचे ठरेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.  हातातल्या कामाचा कंटाळा करू नका. मौल्यवान वस्तूंचे जतन करा.

मकर:-

आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. समस्यांचे निराकरण होईल. वैवाहिक जीवन सुखमय होईल. आरोग्याची काळजी घ्यावी. कोणावरही अति विश्वास दाखवू नका.

कुंभ:-

मुलांच्या जबाबदार्‍या पार पाडाल. पैशाच्या बाबतीतले प्रयत्न यश देतील. थोडीशी धावपळ करावी लागेल. देवावरील श्रद्धा वाढेल. जोडीदाराच्या मदतीने अडकलेल्या गोष्टी पुढे सरकतील.

मीन:-

गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. बोलताना शब्द जपून वापरा. मानसिक शांतता लाभेल. प्रवास लाभदायक ठरतील. मिळकतीचे नवीन स्त्रोत सापडतील.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: