Astro-newToday Rashi Bhavishya, 21 September 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष (Aries Horoscope Today ):-

आळस झटकून कामाला लागा. योजना यशस्वी झाल्याचा आनंद मिळेल. लांबणीवर पडलेली कामे पूर्ण होतील.  प्रवासातून लाभ संभवतो. सहकार्‍यांशी मतभेदाची शक्यता.

वृषभ (Taurus Horoscope Today ):-

आवडीचे पदार्थ खाल. आर्थिक योजना पूर्ण होतील. दिवस मध्यम फलदायी राहील. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

मिथुन (Gemini Horoscope Today ):-

फसवणुकीपासून सावध रहा. धरसोड वृत्ती कमी करावी॰ एखादी घटना मन खिन्न करू शकते. चांगल्या कामाचे पुण्य पदरात पडेल. दिवसभर कामाची धांदल राहील.

कर्क (Cancer Horoscope Today ):-

दिवसाचा बहुतांश वेळ मजेत जाईल. ग्रहांची अनुकूल स्थिती लाभदायक ठरेल. हातातील कामे विनासायास पूर्ण होतील. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. थकवा दूर होईल.

सिंह (Leo Horoscope Today ):-

साधे आणि सरळ जीवन मार्गक्रमीत कराल. सतत आशावादी राहावे. महत्त्वाच्या कामाच्या नोंदी तपासून पहाव्यात. नियोजित कामे पूर्णत्वास जातील. संमिश्र घटनांचा दिवस.

कन्या (Virgo Horoscope Today ):-

दुसर्‍यांच्या उपयोगी याल. लोक तुमचा सल्ला विचारात घेतील. मुलांकडून शुभ वार्ता मिळेल. दूरच्या नातेवाईकांची खुशाली समजेल. जुन्या मित्रांच्या भेटीचा योग येईल.

तूळ (Libra Horoscope Today ):-

तुमच्या बोलण्याचा चांगला प्रभाव पडेल. आत्मविश्वास वाढीस लागेल. लोक तुमच्याकडे प्रभावित होतील. झोपेची तक्रार जाणवेल. नातेवाईकांमध्ये सलोखा जपावा.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):-

उगाच चिडचिड करू नये. संयमी भूमिका घ्यावी. मुलांसोबत दंगामस्ती कराल. करमणुकीत अधिक वेळ घालवाल. कामाच्या बाबतीत सतर्क राहावे.

धनू (Sagittarius Horoscope Today ):-

आज ग्रहमानाची अनुकूलता लाभेल. सरकारी कामे अधिक वेळ खातील. नवीन मित्र जोडले जातील. तरुणांच्यात सामील व्हाल. एखादा चांगला अनुभव गाठीशी बांधाल.

मकर (Capricorn Horoscope Today ):-

जुन्या गोष्टींची खिन्नता बाळगू नका. जवळचा प्रवास कराल. कौटुंबिक मतभेद टाळावेत. कामाचे नवीन धोरण ठरवावे. काटकसरीपणा अंगी बाळगावा.

कुंभ (Aquarius Horoscope Today ):-

आवडी-निवडी बाबत दक्ष राहाल. जोडीदाराचा हट्ट पुरा कराल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. भागिदारीतून लाभ मिळेल. मनाची चंचलता जाणवेल.

मीन (Pisces Horoscope Today ):-

दिवस मनाप्रमाणे घालवाल. आवडत्या गोष्टी करण्याकडे कल राहील. बोलतांना शब्दांचे वजन लक्षात घ्या. आजचा दिवस उत्तम फलदायी राहील. गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडून येतील.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: