Pune One Card for Metro Passengers; पुण्यातील मेट्रो प्रवाशांसाठी ‘पुणे वन कार्ड’; तिकिटासाठी असा होणार कार्डचा फायदा

पुणे : पुणे मेट्रोचा प्रवास सुलभ व्हावा आणि प्रवाशांना तिकीट खिडकीवर उभे राहायला लागू नये, यासाठी आता ‘पुणे वन कार्ड’ हे प्रीपेड कार्ड प्रवाशांच्या सेवेत आणण्यात आले आहे. सध्या हे कार्ड मेट्रो सेवेत चालणार असून, भविष्यात पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसमध्येही हे कार्ड चालावे, यासाठी यंत्रणा उभी केली जाणार आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या उपस्थितीत या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. फडणवीस म्हणाले, ‘पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यामुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. पुणे मेट्रोने ‘पुणे वन कार्ड’द्वारे चांगली सुरुवात केली आहे. हे कार्ड पीएमपी बसमध्येही लागू होईल, अशी व्यवस्था केल्यास त्याची उपयुक्तता वाढेल. भविष्यात देशातील इतर मोठ्या शहरांतही या कार्डचा उपयोग होऊ शकेल. पुण्यात एकात्मिक वाहतूक व्यवस्था निर्माण करून ५०० मीटरवर नागरिकांना विविध वाहतूक पर्याय दिल्यास ते सार्वजनिक वाहतुकीचा जास्त उपयोग करतील.’

Pune News : फक्त पुणे शहरच नाही तर ग्रामीण भागातही मेट्रोची सेवा? वाहतूक कोंडी फोडण्यासाठी खास प्लॅन
मेट्रो सकाळी सहापासून

अजित पवार यांनी शनिवारी सकाळी रुबी हॉल ते वनाझ असा मेट्रोने प्रवास केला. या प्रवासात त्यांनी प्रवाशांशी संवाद साधून, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्यामध्ये अनेकांनी मेट्रो सेवा सकाळी सहापासून सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पवार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना सेवा सुरू करण्याची वेळ बदलण्यास सांगितले. दरम्यान, दैनंदिन पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना डेक्कन क्वीनच्या वेळेत रेल्वे स्थानकात पोहोचता यावे, यासाठी मेट्रो सकाळी सहापासून सुरू झाली पाहिजे, अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

‘कमी कालावाधीत मेट्रोचा विस्तार’

‘पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रोच्या कामालाही गती देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वनाज ते चांदणी चौक आणि नगर रस्त्यावर वाघोलीपर्यंतही मेट्रोचा विस्तार करायचा आहे. कमीत कमी कालावधीत हे काम करायचे आहे; तसेच शहरात लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या भागांत मेट्रो सेवा देण्याचा आमचा मानस आहे,’ असे अजित पवार यावेळी म्हणाले.

‘पुणे वाहतूक कोंडीचे शहर’

‘एका सर्व्हेनुसार पुण्यात वाहनातून दहा किलोमीटर प्रवासासाठी ३० मिनिटांचा कालावधी लागतो. काही दिवशी हा वेळ ४० मिनिटांपर्यंत वाढतो. देशातील वाहतूक कोंडी होणाऱ्या शहरांत पुण्याचा क्रमांक पहिल्या सहामध्ये आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करावी लागेल,’ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Mumbai News: आजपासून रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल, उद्या शिर्डी वंदे भारत रद्द; कारण…

Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: