भाविकांनो काळजी घ्या; अधिक मासाच्या गर्दीचा फायदा, तुळजाभवानी मंदिरात भक्तांचे खिसे कापले

धाराशिव: अधिक मास महिना असल्यामुळे तुळजा भवानीच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी वाढली आहे. चार दिवस सलग आलेल्या सुट्टया आणि अधिक मास महिना यामुळे मंदिरात भक्तांची मांदिआळी आहे. भाविकांच्या याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी भक्तांच्या खिशावर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. भाविकांना थोडा थोडका नव्हे लाखात डल्ला मारण्यात आला आहे. या डल्ल्यामुळे चोरट्यांची दिवाळी झाली तर भक्तांचे दिवाळं निघालं. चोरट्यांनी मंदिरातच चोरी केल्यामुळे मंदिरातील सुरक्षाव्यवस्था किती चोख आहे हे या वरुन दिसुन येते अशी प्रतिकिया दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी दिली.

पोलिसांकडून उपलब्ध माहितीनुसार, किशोर प्रकाश खोपडे (वय. ३४ वर्षे, रा. दत्त चौक गायकवाड आळी, ता.हवेली जि. पुणे) यांना मंदिरात चोरट्यांकडून लुटण्यात आले. तुळजा भवानी मंदिरातील निंबाळकर दरवाज्यामध्ये किशोर खोपडे यांच्या गळयातील १९ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन तसेच संजयकुमार नामदेवराव शिवपुरे यांचे खिश्यातील रोख रक्कम ऐंशी हजार रुपये असे एकुण १ लाख २५ हजार रुपये हे दि. १३ ऑगस्ट २०२३ रोजी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशी तक्रार किशोर खोपडे यांनी तुळजापुर पोलीस ठाणे येथे दिली. त्या प्रमाणे अज्ञात व्यक्ती विरोधात भारतीय दंड विधान संहिता कलम- ३७९ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास गुरुनाथ लोखंडे हे करत आहे.

सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची साई दर्शनासाठी अलोट गर्दी

तुळजा भवानीच्या संरक्षणासाठी तसेच भक्तांच्या संरक्षणासाठी मंदिरातच पोलीस चौकी आहे. तसेच मंदिर प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षेसाठी खाजगी सुरक्षारक्षक सुध्दा ठेवले आहेत. विशेष म्हणजे मंदिरात तसेच मंदिर परिसरात, तुळजापुर शहरात ठिकठिकाणी CCTV कँमेरे बसवले आहेत.तरी सुध्दा चोरट्यांनी डल्ला मारला हे विशेष आहे.

कळसूबाईवर आज फडकणार राष्ट्रध्वज; ‘हर शिखर तिरंगा’ मोहिमेसाठी कर्नल जामवाल महाराष्ट्रात

Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: