Palmistry: तळहातावर ‘या’ खुणा असतील तर गणेशाची नेहमी कृपा राहील; तुमचा हात तपासून पाहा

[ad_1]

Palmistry: हस्तरेखा शास्त्रानुसार, व्यक्तीच्या हातात त्याचे व्यक्तिमत्व आणि भविष्य दडलेले असते. तसेच अनेक प्रकारच्या रेषा आहेत, ज्यामध्ये धनरेषा, जीवनरेषा, विवाह रेषा आणि शिररेषा प्रमुख आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की हातामध्ये देखील अशी काही चिन्हे आहेत. ज्या पाहून कळू शकते की कोणत्या देवाची कृपा तुमच्यावर सदैव राहील. येथे आम्ही अशा चिन्हांबद्दल सांगणार आहोत जे दर्शविते की भगवान गणेशाची तुमच्या जीवनावर विशेष कृपा आहे आणि जोपर्यंत हे चिन्ह तुमच्या तळहातावर आहेत तोपर्यंत तुमच्या जीवनात धन आणि वैभवाची कमतरता कधीच येऊ शकत नाही. चला जाणून घेऊया या चिन्हांबद्दल…

माता लक्ष्मी आणि गणपतीदेवाची कृपा असेल

हस्तरेषा शास्त्रानुसार तळहाताची जीवनरेषा भाग्यरेषेपासून दूर असेल तर धनपती योग तयार होतो. असे लोक अपार संपत्तीचे मालक असतात. यासोबतच माँ लक्ष्मीसोबत गणेशाची विशेष कृपा असते आणि त्यांना एकाच वेळी अनेक स्त्रोतांकडून धन प्राप्त होते. हे लोक कमी वयात चांगले बँक बॅलन्स करतात.

( हे ही वाचा: Venus Transist 2022: ३१ ऑगस्टपासून पुढील १५ दिवस ‘या’ राशींनी राहा सावधान! शुक्र-सूर्य मिळून आणतील अडचणीत वाढ)

त्रिशूल चिन्ह

त्रिशूल हे भगवान शंकराचे प्रतीक मानले जाते आणि ज्या व्यक्तीच्या तळहातावर त्रिशूल चिन्ह असते, त्याच्यावर जन्मापासूनच शिव आणि गणपतीचा आशीर्वाद राहतो. या लोकांचे भाग्य चांगले असते. तसेच हे लोक कोणत्याही क्षेत्रात गेले तरी नाव आणि पैसा कमावतात.

हत्ती चिन्ह

हस्तरेषा शास्त्रानुसार हत्तीचे चिन्ह देखील खूप शुभ मानले जाते. ज्या व्यक्तीच्या तळहातावर हत्तीचे चिन्ह असते, त्याच्यावर श्रीगणेशाची कृपा असते आणि त्याला जीवनात सुख-सुविधा प्राप्त होतात. तसेच, असे लोक नेहमी शत्रूंवर विजय मिळवतात. हे लोक आयुष्यात खूप नाव आणि प्रसिद्धी कमावतात.

( हे ही वाचा: September Planet Transist: सप्टेंबरमध्ये ३ ग्रहांच्या हालचालीत होणार मोठा बदल; ‘या’ ४ राशींचे नशीब अचानक पालटणार)

स्वस्तिक चिन्ह

ज्या व्यक्तीच्या हातात स्वस्तिक चिन्ह असते त्याला जीवनातील सर्व सुख-सुविधा प्राप्त होतात. असे लोक स्पष्ट आणि प्रामाणिक असतात. या लोकांवरही गणपतीचा आशीर्वाद असतो.



[ad_2]

Source link

By jaghit