Nanded Pune Express Video Viral On Former Corporator Parbhani Beating Two Students ; Video : छातीत लाथा, डोकं आपटलं; रेल्वेत दोघा विद्यार्थ्यांना मारहाण; माजी नगरसेवकावर गुन्हा

परभणी: वातानुकूलित रेल्वे डब्यात बसलेल्या दोन विद्यार्थ्यांना परभणीच्या एका माजी नगरसेवकाने जबर मारहाण केल्याची घटना ९ एप्रिल रोजी नांदेड – पुणे एक्सप्रेस रेल्वेमध्ये घडली. या प्रकरणी १८ एप्रिल रोजी नांदेड रेल्वे पोलिसांत नगरसेवकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रशांत उर्फ बबलू केशवराव नागरे असं गुन्हा दाखल झालेल्या माजी नगरसेवकाचं नाव आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

नांदेड येथील २२ वर्षीय दोन विद्यार्थी पुणे येथे जाण्यासाठी पुणे एक्सप्रेस रेल्वेत बसले होते. यातील एक जण बी१ आणि दुसरा बी३ डब्यात होता. नांदेड ते पूर्णा दरम्यान रेल्वे असताना परभणीचा माजी नगरसेवक प्रशांत उर्फ बबलू केशवराव नागरे हा बी३ बोगीत आला. यावेळी त्याची आणि विद्यार्थ्यांची जागेवर बसण्यावरून थोडी बाचाबाची झाली. त्यावेळी नागरे याने विद्यार्थ्यांला जबर मारहाण केली. “एक बच्चे को उठाणा है” असे तो बोलत होता, असं विद्यार्थ्याने सांगितले.
के चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष राज्यात मुसंडी मारण्याच्या तयारीत, भाजप-सेना आमदार संपर्कात असल्याचा दावा
दरम्यान, ही घटना मुलाने त्याच्या पालकांना सांगितली. पालकांनी परभणी पोलिसांना कळवलं. परभणी पोलिसांनी पूर्णा पोलिसांना घटनेची माहिती दिली. रेल्वे येताच पूर्ण पोलिसांनी आरोपी बबलू याला डब्याखाली उतरवून त्याची कानउघाडणी केली. त्यानंतर, पूर्णाहून गाडी निघताच बबलू पुन्हा बी३ बोगीत चढला आणि “तू पोलिसांना बोलावतोस का”? असं म्हणून पुन्हा त्या विद्यार्थ्याला मारहाण केली.

यावेळी घाबरलेला सदर विद्यार्थी बी१ मधील त्याच्या मित्राजवळ जाऊन बसला. तेथेही बबलूने त्याला सोडलं नाही. तो तेथे पोहोचला आणि त्याने विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. यावेळी उपस्थित दुसऱ्या विद्यार्थ्याला “हा कोण लागतो रे तुझा?” अशी विचारणा बबलूने केली. “तो माझा मित्र आहे”, असं उत्तर मिळताच बबलूने त्यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. “काका, मला का मारता? मी काय केलं?” अशी विनंतीपूर्वक विद्यार्थी बोलत असताना बबलू त्यांना मारतच होता. त्याने विद्यार्थ्यांच्या छातीत लाथा मारल्या, त्याचे डोके आपटले, कपाळावर मार लागला आणि डोके आपटल्याने डोक्याच्या मागील बाजूस वेदना झाल्या. परभणीला गाडी येताच बबलू उतरून निघून गेला.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी पुणे येथे पोहोचताच विद्यार्थ्यांनी खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. मारहाणीमुळे दोन्ही विद्यार्थी घाबरले होते. ते डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता होती. यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी पालकांना बरीच मेहनत घ्यावी लागली. १८ एप्रिल रोजी या घटनेची तक्रार नांदेड रेल्वे पोलिसांत देण्यात आली. बबलू नागरेविरुद्ध दोन गुन्हे दाखल झाले. पोलीस निरीक्षक संतोष उनऊने यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

बायकोसोबत अनैतिक संबंधाचा राग, नाशकातील हत्येचा अखेर उलगडा; तब्बल ९ वर्षांनी भोंदूबाबा सापडला

Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: