लॉजसमोर झोपलेल्या रिक्षा चालकाचा खून, भररस्त्यात दगडाने ठेचलं, कारण समजताच पोलीस हादरले - maharashtra crime news nagpur rickshaw driver murder in front of gujarat lodge

नागपूर :सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हनुमान मंदिर गली येथील गुजरात लॉजसमोर शुक्रवारी पहाटे एका तरुणाने ऑटो चालकाचा दगडाने ठेचून खून केला. राजकुमार यादव असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मृतक लष्करीबाग येथील रहिवासी असल्याचे समजते. मृतक हा हॉटेलबाहेर झोपला होता, त्याच वेळी चोरीच्या उद्देशाने आलेल्या एका तरुणाने त्याची हत्या केली. ही घटना परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. साहिल राऊत असे आरोपीचे नाव आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हनुमान मंदिर गल्ली येथील गुजरात लॉजसमोर रक्ताने माखलेला मृतदेह पेंढऱ्यावर पडलेला दिसल्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता तपासाअंती असे आढळून आले की, मृत व्यक्ती ५५ वर्षीय राजकुमार यादव, लष्करी बाग येथील रहिवासी असून तो ऑटोचालक आहे. आवारात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता शुक्रवारी पहाटे अज्ञात तरुण तेथे चोरीच्या उद्देशाने आल्याचे निष्पन्न झाले.

संसारवेल फुलण्याआधीच कोमेजली, १९ वर्षीय नवविवाहितेने मृत्यूला केलं जवळ
राजकुमार यादव याची दगडाने ठेचून हत्या करून तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

नवनिर्वाचित सरपंचाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या; भर चौकात आधी रेकी, काहीच मिनिटांत हल्ला

नागपुरात खुनाचे प्रमाण वाढत आहे

नागपूर शहरात सातत्याने खून, दरोडे, लुटमारीच्या घटनांसह गुन्हेगारी वाढली आहे. मात्र, याच दरम्यान नागपूर शहर पोलीस यांनी शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी गुन्हेगारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अनेक गुन्हेगारांवर एमपीडीए आणि हद्दपारीची कारवाई करण्यात आली. असे असतानाही खुनाच्या घटना कमी होण्याचे नाव घेत नाहीत. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे नागपुरातील नागरिक घाबरले आहेत. गुन्हेगारांची संख्या कमी करण्याबरोबरच हिंसाचाराची प्रवृत्ती कमी करण्याचे आव्हान पोलिसांनी स्वीकारले पाहिजे. तरच खुनाचा आकडा कमी होऊ शकेल.

आज जरा वेगळ्या पद्धतीने करुयात, महिलेचा नकार; तरुणाने जीव घेतला, मग मृतदेहासोबत शरीरसंबंध

Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: