Astro-newToday Rashi Bhavishya, 8 September 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष (Aries Horoscope Today ):-

व्यवसायात स्वत:च अस्तित्व निर्माण कराल. शांत पद्धतीने केलेली कामे यश देतील. गरजूंना मदत कराल. चांगल्या कामासाठी पैसे खर्च होतील. भावंडांशी नाते दृढ होईल.

वृषभ (Taurus Horoscope Today ):-

अनपेक्षित लाभ होतील. तुमच्यावर शंका घेतली जाईल असे वागू नका. कर्ज व्यवहार टाळावेत. व्यवसाय विस्ताराचा विचार कराल. कामात क्षुल्लक समस्या येऊ शकतात.

मिथुन (Gemini Horoscope Today ):-

अचानक लाभाची शक्यता. जुन्या प्रश्नांची उकल होईल. जोडीदार तुमच्यावर खुश होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. हित शत्रूंच्या कारवाया वाढतील.

कर्क (Cancer Horoscope Today ):-

घरात चांगले कार्य घडेल. समोरच्याचे वर्चस्व राहील. वरिष्ठ अधिकार्‍यांचा पाठिंबा मिळेल. ज्येष्ठ अधिकार्‍यांची गाठ पडेल. प्रेमसंबंध मानसिक शांतता प्रदान करतील.

सिंह (Leo Horoscope Today ):-

सर्वांशी सामंजस्याने वागाल. भागीदारीत काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत. आपले स्पर्धक त्रास देऊ शकतात. आत्मविश्वास वाढीस लागेल. झालेल्या लाभाची वाच्छता करू नये.

कन्या (Virgo Horoscope Today ):-

घरातील कामात आनंद मिळेल. तब्येतीची काळजी घ्या. जुनी समस्या संपुष्टात येईल. प्रलंबित कामे यशस्वीरित्या मार्गी लागतील. दिवसाचा उत्तरार्ध मित्रांसोबत घालवाल.

तूळ (Libra Horoscope Today ):-

अपेक्षित उत्तराची प्रतीक्षा संपेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. कार्यक्षेत्रात जोखीम पत्करताना सावधानता बाळगा. कर्जाचे व्यवहार टाळावेत. कामावर अधिक लक्ष केंद्रीत करावे.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):-

व्यवसायात पुढारीपणा दाखवाल. गोड बोलून कामे करून घ्याल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. नियोजन व कौशल्य पणाला लागू शकते. कामाच्या ठिकाणी वादात पडू नका.

धनू (Sagittarius Horoscope Today ):-

घरातील वातावरण आनंददायी असेल. मोठ्या वस्तूंची खरेदी होईल. अधिकारी वर्गाकडून पूर्ण सहयोग मिळेल. पालकांच्या सल्ल्यानेच कामे करावीत. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

मकर (Capricorn Horoscope Today ):-

समोरच्यावर एकदम विश्वास ठेऊ नका. विद्यार्थ्यांनी चिकाटी सोडू नये. लाभ पदरात पडून घ्यायला धावपळ होईल. काही सकारात्मक वार्ता मिळतील. मानसिक तणाव निवळतील.

कुंभ (Aquarius Horoscope Today ):-

संभ्रमात कोणतेही काम करू नका. एकाच वेळी अनेक कामे सामोरी येतील. जुनी कामे मार्गी लागतील. प्रवास जपून करावा. संसर्गजन्य विकारांपासून काळजी घ्या.

मीन (Pisces Horoscope Today ):-

नवीन अधिकार हातात येतील. खाण्यावर नियंत्रण ठेवा. व्यावसायिक विस्तारासाठी अनुकूल काळ. कौटुंबिक जबाबदार्‍या उत्तमरीत्या पार पाडाल. विवाह इच्छुकांना पुढील बोलणीसाठी अनुकूल दिवस.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: