Thane News : खोणी तळोजा महामार्गाच्या कडेला असलेल्या उसाटने येथे अजगर मृत अवस्थेत आढळल्यानंतर मलंगगड वाडी येथेजिवंत अजगर आढळून आला होता. या नंतर बुधवारी रात्री मलंगगड रोड वरील खरड गावात ८ फुटी अजगर आढळून आला.
हायलाइट्स:
- खरड गावात आठ फुटी अजगराला जीवनदान
- मलंगगड पट्ट्यात चार दिवसांत तिसरा अजगर
- ठाण्यातील मलंगगड भागातील प्रकार
खोणी तळोजा महामार्गाच्या कडेला असलेल्या उसाटने येथे अजगर मृत अवस्थेत आढळल्यानंतर मलंगगड वाडी येथेजिवंत अजगर आढळून आला होता. या नंतर बुधवारी रात्री मलंगगड रोड वरील खरड गावात ८ फुटी अजगर आढळून आला. रात्रीची वेळ असल्याने ग्रामस्थांनी या अजगराला पकडून ड्रममध्ये ठेवला होता. सकाळी सर्प मित्रांच्या सहाय्याने या अजगराला बदलापूर वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आले. खरड गावात पहिल्यांदाच अजगर आढळून आला असल्याचे ग्रामस्थ सांगतात.
या अजगराला प्लास्टिकच्या ड्रममध्ये ठेवतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अजगर दिसल्यास त्याला न मारता सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाचे परिक्षेत्र अधिकारी विवेक नातू यांनी नागरिकांना केलं आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.