unemployed girl raped, धक्कादायक! ती तरुणी बेरोजगार होती, हे हेरून कथित समाजसेवकाने नोकरीचे आमिष दाखवत केला अत्याचार - the life of an unemployed young woman was spoiled by an alleged social worker after luring her with a job

छत्रपती संभाजीनगर :शहरातील २९ वर्षीय तरुणीला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून स्वतः समिती समाजसेवक म्हणून मिरवणाऱ्या एका नराधमाने तरुणीवर वेळोवेळी शारीरिक अत्याचार केला. तरुणीवर अत्याचार करण्याचा व्हिडिओ तयार करत नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देणाऱ्या तरुणाच्या विरोधात मंगळवार, दिनाक २५ एप्रिल रोजी जिन्सी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सय्यद जावेद सय्यद जफर (वय ३१ वर्षे, रा. रहीमनगर, गल्ली नंबर- ३, अल्तमास कॉलनी) असे अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. सय्यद जावेद हा एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदत करतो. यातून तो समाजसेवक म्हणून समाजामध्ये मिरवत असतो अशी या आरोपीची ओळख आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की २९ वर्षीय पीडितेने बेरोजगार असून ही नोकरीच्या शोधात होती नोकरी मिळवण्यासाठी जून २०२१ ला ती एका शाळेत गेली.

हृदयद्रावक! सर्विसिंग सेंटरमध्ये गाडी धूत होता, क्षणात असे काही घडले की होत्याचे नव्हते झाले
शाळेत काम आटोपल्यानंतर बाहेर आल्यानंतर ओळखीचा असलेला जावेद हा तिथे होता. यावेळी त्यांनी तिला वडापाव खाण्यासाठी बोलवलं. वडापाव व पिण्याचे पाणी दिल्यानंतर पीडितेला चक्कर आली. यावेळी आरोपीने तिला रिक्षा स्टँडवर सोडतो असे सांगून थेट स्वतःच्या घरी येऊन गेला. तरुणीला घरी घेऊन गेल्यानंतर तिला निर्वस्त्र करत तिच्यावरती अत्याचार केला.

या दरम्यान आरोपीने व्हिडिओ शूट केला दरम्यान या व्हिडिओची धमकी दाखवत पिढी त्याला वारंवार त्रास देत होता. तरुणीला बदनामी करण्याची भीती दाखवत वारंवार घरी बोलून अत्याचार करत होता बदनामी होऊ नये या भीतीपोटी तरुणी गप्प होती मात्र सय्यद जावेद हा वारंवार घरी बोलून अत्याचार करत असल्यामुळे पिढीचा त्रस्त झाली होती.

जेसन रॉयची तुफानी फटकेबाजी, शाहबाज अहमदला रिमांडवरच घेतले, एकाच षटकात ठोकले ४ षटकार
दरम्यान कंटाळलेल्या तरुणीने मंगळवार दिनांक २५ रोजी थेट जिंसी पोलीस ठाणे गाठत आरोपी विरोधात फिर्याद दिली. पीडितेला दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक भंडारी यांनी अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सोनावण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मीरा चव्हाण करीत आहेत.

धाराशिव हादरला! शेतीच्या बांधावरून भांडण झाले, तीन तरुणांनी त्याला चौकात गाठले संपविले

Source link

By jaghit