[ad_1]
अकोला पोलिसांना माहिती मिळाली की एका चारचाकी वाहनातून महिलेचा मृतदेह नेऊन तिची विल्हेवाट लावल्या जात आहे. या माहितीनंतर चान्नी पोलिसांनी नाकाबंदी करून या संशयित वाहनाला थांबविले आणि वाहनाच्या तपासणी दरम्यान पत्नीचा मृतदेह वाहनातून संशयास्पद फिरविताना एक डॉक्टर पती पोलिसांना दिसून आला.
हेही वाचा –पिकनिकचा निम्मा खर्च कर! गुरुजींचा नकार; तीन मित्र संतापले, शिक्षकाला मारुन विहिरीत फेकले
या महिलेसंदर्भात पोलिसांनी त्याला विचारणा केली असता, पतीकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पत्नीची प्रकृती खराब आहे, हृदयविकारामुळे मृत्यू झालाय, गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी अनेक उत्तरे त्याने पोलिसांना दिली. लागलीच पोलिसांना त्याच्यावर संशय झाला, पतीच्या वाहनातूनच महिलेला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु इथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
हा संपूर्ण प्रकार १६ सप्टेंबरला सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडला आहे. दरम्यान, चान्नी पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात पाठविला असून आज शनिवारी सायंकाळी तिचा वैद्यकीय अहवाल आलाय. वैद्यकीय अहवालामध्ये खळबळजनक माहीती समोर आली. यामध्ये मृतक महिलेची गळा आवळून हत्या झाल्याचं समोर आलं.
हेही वाचा –महिन्याभरात लग्न मोडलं, मग लिव्ह-इन पार्टनरनं संपवलं; गर्भवती नर्सच्या आत्महत्येचा बनाव
वर्षा राजेश ठाकरे (वय ३३, राहणार पातुर) असं या मृतक महिलेचं नाव आहे. तर डॉक्टर राजेश ठाकरे असं तिच्या पतीचे नाव आहे. दरम्यान, वैद्यकीय अहवालानंतर आता डॉक्टर पतीला पोलीस ताब्यात घेणार असून त्याची कसून चौकशी केल्यानंतरच नेमकं हत्येचं कारण काय आहे? हे स्पष्ट होईल.
पातुर शहरात झाली वर्षाची हत्या
चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश वाघमारे, उपनिरीक्षक गणेश महाजन, दत्ता हिंगणे यांनी तत्काळ सतर्कता दाखवून आलेगाव रस्त्यावर डॉक्टरच्या वाहनाचा पाठलाग केला आणि वाहन थांबवून डॉक्टर पतीकडे पोलिसांनी विचारपूस केली. त्यानंतर हा सर्व हत्येचा रचलेला कट समोर आलाय. दरम्यान, वर्षा ठाकरे यांची हत्या पातुर शहरातील तिच्या राहत्या घरात झाली असल्याने पुढील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पातुर पोलिसांत होणार आहे., अशी माहिती ही चान्नी पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा –संतापजनक! स्पामध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून ठेवलं, पण दररोज १०-१५ जणांकडून अल्पवयीनवर अत्याचार
जतनेची आश्वासनं ठाकरे सरकारनं कधीही पूर्ण केली नाही; शहाजी बापूंची बोचरी टीका
[ad_2]
Source link