sunil kamble, बिल्डरच्या फायद्यासाठी झोपडपट्टीतील नागरिकांना दमदाटी? भाजप आमदाराचा व्हिडिओ व्हायरल - maharashtra pune bjp mla sunil kamble threaten to citizen market yard anandnagar slum


पुणे : पुण्यातल्या कॅन्टोन्मेंट मतदार संघातले आमदार सुनील कांबळे यांचा नागरिकांना दमदाटी करतानाच व्हिडिओ सद्या व्हायरल होतोय. पुण्यातल्या मार्केट यार्डमधील आनंदनगर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना तिथून हकलून लावण्यासाठी आमदार कांबळे आणि त्यांचे साथीदार स्थानिकांना दमदाटी करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

भाजपा आमदार सुनील कांबळे आणि त्यांचे काही सहकारी मार्केट यार्ड परिसरामधील आनंदनगर झोपडपट्टीमध्ये काही स्थानिक नागरिकांना दमदाटी करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालाय. एका खाजगी बांधकाम व्यावसायिकाला फायदा पोहोचवण्यासाठी सुनील कांबळे आणि त्यांचे काही सहकारी झोपडपट्टीमध्ये जाऊन झोपडपट्टीतील रहिवाशांना दमदाटी आणि शिवीगाळ करत आहेत, असा आरोप तेथील रहिवाशी करत आहेत.

सुनील कांबळे यांच्या सोबत असलेला एक व्यक्ती झोपडपट्टीतील रहिवाशांना मारण्यासाठी हातात लोखंडी हातोडा घेऊन धावताना देखील दिसत आहे. त्यामुळे एकूणच या सर्व प्रकारामुळे मार्केट यार्ड परिसरातील आनंदनगर झोपडपट्टी परिसरामध्ये आमदार सुनील कांबळे यांच्याविषयी मोठी दहशत निर्माण झाली आहे.

या प्रकरणात आनंदनगर झोपडपट्टीतील स्थानिक नागरिकांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे ऑनलाइन तक्रार केली आहे. स्थानिक मार्केट यार्ड पोलीस स्टेशनमध्ये आमदारांच्या विरोधात तक्रार घेणार नाही, म्हणून नागरिकांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे ऑनलाईन तक्रार केली आहे.

यापूर्वी देखील आमदार सुनील कांबळे यांनी महापालिकेतील एका महिला कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करून दमदाटी करतानाची कथित ऑडियो क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा आमदार सुनील कांबळे यांच्याशी संबंधित वादग्रस्त व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: