बदलापूर एमआयडीसी मधील गगनगिरी फार्मा केमिकल नावाची कंपनीत ही आग लागली आहे. गगनगिरी फार्मा केमिकल कंपनीमध्ये विविध प्रकारचे फार्मा इंडस्ट्रीसाठी लागणारे केमिकल तयार करण्याचे काम केले जात होते. दरम्यान, आज दुपारी पावणे दोनच्या सुमारास अचानक या कंपनीमध्ये आग लागली. या कंपनीत ज्वलनशील पदार्थांचा साठा असल्यामुळे काही वेळातच या आगीने रौद्ररूप धारण केले.
बदलापूर पालिकेची अग्निशमन यंत्रणा समोरच असल्याने बदलापूर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. या जवानांनी ही आग तत्काळ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र कारखान्यात अत्यंत ज्वलनशील रसायन असल्यामुळे ही आग क्षणार्धात वाढली आणि संपूर्ण कंपनी या आगीच्या विळख्यात सापडली. यामुळे ही भीषण आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत.
आग लागल्याचे लक्षात येताच कंपनीतील कामगारांनी स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी कंपनीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आग लागल्याचे लक्षात येताच कंपनीतील कामगारांनी स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी कंपनीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या आगीच्या घटनेत दोन कामगार जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
आगीत जखमी कामगार रुग्णालयात दाखल
सध्या कुलिंगचे काम चालू असून सदर आगीमध्ये कंपनीतील एक कामगार भाजल्याने त्यात इस्पितळात दाखल केले आहे. तसेच ज्यावेळी कंपनीत आग लागली तेव्हा तेव्हा एकच घबराट पसरली. यावेळी आपला जीव वाचविण्यासाठी कामगार सैरावैरा धावू लागले. यात ३ कामगारांनी उडया मारल्याने त्यांना किरकोळ दुखापती झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.