Shankar Jagtap on Chinchwad Bypoll Election; चिंचवडच्या पोटनिवडणुकीत उभे राहणार का, आमदार होणार का? लक्ष्मण जगतापांच्या भावाचं मोठं वक्तव्य

पिंपरी : जगताप कुटुंबीय हे पक्षाशी एकनिष्ठ आहे. काही महिन्यांपूर्वी लक्ष्मण भाऊंनी देखील पक्षाशी एकनिष्ठता दाखवली होती. आमच्या परिवारातील सदस्य हे दुःखातून अजूनही सावरले नाहीयेत. त्यामुळे आमच्या घरात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. परंतु जगताप कुटुंबीय हे भाजपशी एकनिष्ठ असून पक्ष उमेदवारी देईल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू, असे मत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी व्यक्त केले. पण असं असलं तरी उमेदवारी मिळावी, यासाठी शंकर जगताप यांचे प्रयत्न सुरुच आहेत.

भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघात २७ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली होती. मात्र आता मतदानाची तारीख बदलण्यात आली असून २७ फेब्रुवारी ऐवजी २६ फेब्रुवारीला ही निवडणुक पार पडणार आहे तर २ मार्च २०२३ रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.

दरम्यान, चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अगदीच कमी आहे. चिंचवडची जागा राष्ट्रवादीकडे असल्याने अजित पवार यांच्याकडे संबंधित जागा जिंकण्याची जबाबदारी राष्ट्रवादीने सोपवली आहे. मविआ देखील पूर्ण ताकदीने भाजपविरोधात ही निवडणूक लढणार आहे. त्यामुळे भाजप चिंचवडमध्ये कुणाला उमेदवारी देतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

असं असलं तरी दिवंगत लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी मिळू शकते, अशी जोरदार चर्चा आहे. आजच्या भाजपा कोअर कमिटीची बैठक झाली. यामध्ये जगताप कुटुंबातील लक्ष्मण जगताप यांची पत्नी अश्विनी जगताप त्याचबरोबर त्यांचे बंधू शंकर जगताप यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी माध्यमांनी शंकर जगताप यांना उमेदवारीची आशा आहे का? असं विचारताच त्यासाठीच तर इथे आलोय, असं शंकर जगताप म्हणाले.

Source link

By jaghit