Satej Patil Dhananjay Mahadik Once Friend Now Political Opponents; सतेज पाटील धनंजय महाडिक मित्र ते राजकीय विरोधक, ९ वर्षात काय घडलं?

कोल्हापूर :सतेज पाटलांना आमदार केलं, ही माझी आयुष्यातील सर्वांत मोठी चूक झाली,अशा शब्दात महादेवराव महाडिकांनी सतेज उर्फ बंटी पाटलांच्या आमदारकीचा इतिहास ताजा केला आहे. एकेकाळी सतेज पाटलांमागे ताकद लावून महादेवराव महाडिकांनी त्यांना आमदार केलं. मात्र, पुढे बदललेल्या राजकीय गणितांमुळं सतेज पाटलांनी महाडिकांनाच पराभूत केलं. महाडिकांच्या तालमीत तयार झालेल्या सतेज पाटलांनी आता महाडिक परिवाराच्या वर्चस्वाला पुरता सुरूंग लावण्याचं ठरवलंय. त्यातच राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे पुन्हा एकदा पाटील-महाडिक गट आमनेसामने आलेत. कारखान्याच्या निवडणुकीत सतेज पाटलांनी कंडका पाडायचा निर्धार केलाय.

पाटील-महाडिकांच्या दोस्तीत कंडका कसा पडत गेला?

एकेकाळी सतेज पाटील आणि महादेवराव महाडिकांचे पुतणे धनंजय उर्फ मुन्ना महाडिक जिवलग मित्र होते. त्यांच्या दोस्तीचे किस्से रंकाळ्याच्या चौपाटीवर चर्चिले जायचे. दोघांनीही महादेवराव महाडिकांच्या तालमीत राजकारणाचे धडे घेतले. जिल्ह्यातल्या प्रस्थापित नेत्यांविरोधात राजकारणाला सुरूवात केली. पण पक्षीय राजकारणामुळे पाटील-महाडिकांमधील दरी वाढत गेली.

२००४ च्या लोकसभा निवडणुकीत मुन्ना महाडिक शिवसेनेकडून मैदानात उतरले, पण पराभव झाला. धनंजय महाडिकांसाठी सतेज पाटलांनी ताकद लावली होती. तर, २००४ च्या विधानसभा निवडणुकीत सतेज पाटलांनी नशीब आजमावलं आणि अपक्ष लढत विजय मिळवला. या विजयासाठी महादेवराव महाडिकांनी प्रयत्नांची शर्थ केली होती. काँग्रसने तिकिट नाकारल्यामुळे अपक्ष लढत विधानसभेत गेलेल्या सतेज पाटलांनी २००९ ला काँग्रेसकडून तिकिट मिळवलं आणि पक्षीय राजकारणाला सुरूवात केली. इथेच पाटील-महाडिकांमध्ये वादाची ठिणगी पडली.

स्वस्तात सोन्याची नाणी खरेदी महागात, सोलापूरच्या महिलेची फसवणूक, तिघांनी २ कोटींना गंडा घातला, नेमकं काय घडलं?

२००९ ला लोकसभेसाठी धनंजय महाडिक इच्छुक, पण राष्ट्रवादीकडून संभाजीराजेंना उमेदवारी मिळाली होती. धनंजय महाडिकांचं तिकीट कापण्यात सतेज पाटलांचा हात असल्याच्या चर्चांमुळे दोन्ही गट आमनेसामने आले होते. २०१४ ला लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून धनंजय महाडिकांना उमेदवारी देण्यात आली. शरद पवारांच्या शब्दाखातर आघाडी धर्म पाळत सतेज पाटलांनी धनंजय महाडिकांना पाठिंबा देत विजयात हातभार लावला. पण विधानसभा निवडणुकीत बंटी पाटलांविरोधात अमल महाडिक रणांगणात उतरले. २०१४ ला मोदी लाटेत अमल महाडिकांनी विजय मिळवला. त्यामुळे २०१५ च्या विधानपरिषद निवडणुकीत अमल महाडिकांचे वडील महादेवरावांना धूळ चारत सतेज पाटलांनी पराभवाचा वचपा काढला

दुपारी दुकानात आला, ज्युसमधून विषारी औषध घेतलं; स्वत:च्याच मेडिकलमध्ये उच्चशिक्षित तरुणाने आयुष्य संपवलं

लोकसभेला धनंजय महाडिकांना सहकार्य करण्याच्या बदल्यात सतेज पाटलांनी विधानसभेला मदत करण्याची अट टाकली होती. पण महादेव महाडिकांनी शब्द पाळला नाही, त्यामुळे सतेज पाटलांच्या वर्मी घाव लागला. याचाच बदला घेण्याचं सतेज पाटलांनी ठरवलं. महादेवराव महाडिकांना विधानपरिषदत पराभूत केल्यानंतर आमचं ठरलंय हा पॅटर्न राबवला. २०१९ च्या लोकसभेला धनंजय महाडिकांचा आणि विधानसभा निवडणुकीत अमल महाडिकांचा पराभव घडवून आणला. त्यानंतर कोल्हापूर महापालिका, जिल्हा बॅंक आणि गोकूळमधील महाडिकांचं वर्चस्व मोडित काढलं. त्यापाठोपाठ कारखानाही ताब्यात घेण्यासाठी सतेज पाटील सरसावलेत.

विराट कोहलीला अर्धशतकाचं सेलिब्रेशन पडलं महागात, छाती ठोकून बॅट दाखवली अन्…

Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: