Pitru-Paksha-2022

[ad_1]

हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या अमावास्येपर्यंत चालू असतो. यावेळी लोक आपल्या पितरांचे श्राद्ध आणि तर्पण करतात. तर ज्या लोकांच्या जन्मपत्रिकेत पितृदोष असतो ते लोक सर्व पितृ अमावस्येला पिंड दान आणि तर्पण करतात. यावर्षी पितृपक्ष १० सप्टेंबर २०२२ पासून सुरू होत आहे, जो २५ सप्टेंबर २०२२ पर्यंत चालणार आहे. या काळात कोणती कामे करण्यास मनाई आहे ते जाणून घेऊया.

कांदा आणि लसूण खाणे टाळा
श्राद्ध पक्षात कांदा आणि लसूण खाणे टाळावे. कारण शास्त्रात त्यांना तामसिक मानले गेले आहे. म्हणूनच ते आपल्या इंद्रियांवर परिणाम करतात.

आणखी वाचा : सिंह राशीमध्ये सूर्य-शुक्र युती, या ३ राशींच्या व्यक्तींनी काळजी घ्या

कोणता उत्सव साजरा करू नये
पितृपक्षात कोणीही उत्सव साजरा करू नये. या कालावधीत कोणत्याही प्रकारचे उत्सव आपल्या पूर्वजांच्या श्रद्धेवर परिणाम करतात. या दिवसात तुम्ही तुमच्या मनात देवाचे कीर्तन करू शकता.

नवीन गोष्टी करणे टाळा
शास्त्रानुसार श्राद्धाच्या वेळी नवीन कपडे खरेदी करणे, घरात प्रवेश करणे वर्ज्य आहे. त्यामुळे कोणतेही नवीन काम करणे टाळा. पितृपक्षात नखे कापणे, केस कापणे आणि दाढी करणे टाळावे.

आणखी वाचा : Pitru Paksha 2022: १२ वर्षांनंतर यंदा १६ दिवसांचे श्राद्ध, जाणून घ्या सविस्तर…

या गोष्टी करा
शास्त्रानुसार ज्या तिथीला तुमच्या पूर्वजांचा मृत्यू झाला, त्या दिवशी तुम्ही त्यांच्यासाठी अन्न आणि वस्त्र दान करू शकता. तुम्ही ब्राह्मणालाही भोजन दान करू शकता.

पितृपक्षात जेव्हा जेव्हा एखादा प्राणी किंवा भिकारी दारात येतो, तेव्हा त्याला अन्न आणि पाणी द्यावे. पितृपक्षामध्ये पितर कोणत्याही रूपात येऊन अन्नपाणी मागू शकतात असं म्हणतात.

पितरांना पाणी देताना तळहातात कुश आणि तीळ असणे अत्यंत आवश्यक आहे. तीळ आणि कुशातून पाणी दिल्याशिवाय पितरांची तृप्ती होत नाही. ते असमाधानी राहतात. त्यामुळे कुटुंबात सुख-समृद्धी नाहीशी होते.

आणखी वाचा : Chanakya Niti: या ३ कारणांमुळे पती-पत्नीमधला दूरावा वाढतो, जाणून घ्या सुखी वैवाहिक जीवनाचा मंत्र

कधी आणि कोणत्या तारीखेला कोणतं श्राद्ध?

दिवस – श्राद्ध
१० सप्टेंबर – प्रतिपदा श्राद्ध
११ सप्टेंबर – द्वितीयेचे श्राद्ध
१२ सप्टेंबर – तृतीयेचे श्राद्ध
१३ सप्टेंबर – चतुर्थी श्राद्ध
१४ सप्टेंबर – पंचमीचे श्राद्ध, भरणी नक्षत्राचे श्राद्ध
१५ सप्टेंबर – षष्ठीचे श्राद्ध, कृतिका नक्षत्राचे श्राद्ध
१६ सप्टेंबर – सप्तमी श्राद्ध
१७ सप्टेंबर – या दिवशी श्राद्ध नाही
१८ सप्टेंबर – अष्टमी श्राद्ध
१९ सप्टेंबर – नवमी श्राद्ध, सौभाग्यवती श्राद्ध
२० सप्टेंबर – दशमी श्राद्ध



[ad_2]

Source link

By jaghit