पिंपरी: महाराष्ट्रातील प्रमुख लोक दैवत म्हणून जेजुरीचा खंडोबा प्रसिद्ध आहे. जेजुरीच्या खंडोबाचे भाविक महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील आहेत. महाराष्ट्राच्या लोकपरंपरेनं नेहमीच एकात्मता आणि बंधुभावाला प्रोत्साहन दिलेलं आहे. जेजुरीच्या खंडोबाच्या विविध परंपरा आणि विविध मान वेगवेगळ्या समाजाकडे आहेत. जेजुरीच्या खंडोबारायाला पंच कल्याणी अश्व अर्पण करण्याचा मान मुस्लीम समाजाकडे आहे. पिंपरी चिंचवडचे माजी उपमहापौर महंमदभाई पानसरे यांच्या वतीने जेजुरी येथील खंडोबारायला गुढीपाडव्याच्या दिवशी ‘पंचकल्याणी अश्व’ अर्पण करण्यात येणार आहे. उद्या बुधवारी हा सोहळा श्रीक्षेत्र जेजुरी येथे पार पडणार आहे. त्या पार्श्व भूमीवर पिंपरी येथे भाविकांनी अश्व पाहण्यासाठी गर्दी केली होती. पिंपरीतील हिंदुस्थान ॲन्टिबायोटिक्स (एचए) कॉलनीत ही गर्दी केली होती. महमंदभाई पानसरे यांनी २० वर्षापूर्वी जेजुरीच्या खंडोबासाठी पंच कल्याणी अश्व अर्पण केला होता. त्या अश्वाचं वय झाल्यानं आता नवा अश्व अर्पण करण्यात येणार आहे.
पानसरे हे खंडोबा देवाच्या अश्वांचे मानकरी आहेत. ते पिंपरीतील एच ए कॉलनीत रहात असल्याने अनेक राजकीय नेत्यांनी अश्व पाहण्यासाठी गर्दी केली होती. या वेळी कसबा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर, माजी महापौर योगेश बहल, माजी नगरसेवक जितेंद ननावरे, माजी नगरसेविका अमिना पानसरे आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी परीक्षा हॉलमधील राग बाहेर काढला, शाळेच्या गेटजवळ दगडफेक, शिक्षकाचं डोकं फुटलं
पिंपरी येथून आज हा अश्व जेजुरीला रवाना झाला आहे. त्या अगोदर तो श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेणार असून त्यानंतर पुढील प्रवासाला रवाना होईल. हे पांचकल्यानी अश्व अकलूज येथून आणण्यात आले आहे. त्याची उद्या पाडव्यानिमित्त विधिवत पूजा करून खंडोबा देवाच्या सेवेत अर्पण केले जाणार आहे, अशी माहिती पानसरे यांच्याकडून देण्यात आली आहे.
नोटांचं बंडल आणि स्वतःलाच श्रद्धांजली, व्हॉट्सअप स्टेटस ठेवत तरुणाचं मध्यरात्री टोकाचं पाऊल
जेजुरीच्या खंडेराया पेन्शन दे, आंदोलनात कर्मचाऱ्यांचा मुरळी डान्स
यावेळी पानसरे यांनी सांगितले की, शंभर वर्षाहून अधिक काळ आमच्या घराण्याकडे खंडोबा देवाची सेवा आमच्याकडे आहे. माझ्या हयातीत हा मी सहावा अश्व खंडोबा देवाला अर्पण करत असल्याचे पानसरे यांनी सांगितले आहे. तसेच सामजिक विचारातून अर्पण केलेला हा अश्व असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पाहुण्यांना भेटून घरी निघाले, विजेची तार दुचाकीवर पडली, प्रवाशांनी माणुसकी दाखवली पण नियतीच्या मनात वेगळंच..