ncp sharad pawar, आवश्यकता असेल तर शरद पवार मला फोन करून मार्गदर्शन करतात; पुण्यात मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य - sharad pawar calls me and guides me says cm eknath shinde in pune program

पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची ४६ वी सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज एकाच मंचावर आले होते. यावेळी आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. तसंच आवश्यकता असते तेव्हा फोन करून ते मला मार्गदर्शन करतात, असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.

‘पवारसाहेब नेहमीच सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात. ते एक अनुभवी नेते आहेत. त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात आणि देशात विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांचं योगदानही फार मोठं आहे. सत्तेत कोण बसलंय हे न पाहता राज्याच्या आणि राज्यातील जनतेच्या हितासाठी ते नेहमी मार्गदर्शन करतात. मलाही जेव्हा-जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा ते फोन करतात आणि मार्गदर्शन करतात,’ असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला.

दरम्यान, सहकार क्षेत्रातील शरद पवार यांचं योगदान कोणालाही नाकारता येणार नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

एकनाथ शिंदे-अजित पवारांमध्ये चर्चा

पुण्यातील या कार्यक्रमादरम्यान शरद पवार यांचं भाषण सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात व्यासपीठावर सुरू असलेल्या चर्चेने सगळ्यांचंच लक्ष वेधलं. पवार यांचं भाषण सुरू असताना शिंदे-अजित पवारांमध्ये बऱ्याच वेळ चर्चा सुरू होती. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय खलबतं झाली, याबद्दल आता तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

Source link

By jaghit