mumbai local news today, फर्स्ट क्लासच्या पासवर आता करा एसी लोकलचा प्रवास, पण त्या आधी जाणून घ्या 'हे' नियम! - first-class passengers in mumbai can now travel in ac locals

मुंबईः रेल्वे मंत्रालयाने साध्या लोकलचा प्रथम श्रेणीचा पास (फर्स्ट क्लास) एसी लोकलच्या पासमध्ये अपग्रेड करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मशन सिस्टिमकडून चाचणी घेण्यात येत होती. अखेर ही चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असून आज शनिवार २४ सप्टेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

मुंबईकरांना फर्स्ट क्लासचा पास आता एसी लोकलमध्ये अपग्रेड करता येणार आहे. या शनिवारपासून ही सुविधा सुरू होत आहे. मात्र, ही सुविधा फक्त त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक पासधारकांसाठी असणार आहे. फर्स्ट क्लासच्या पासधारकांना एसी लोकलचा पास अपग्रेड करण्यासाठी पासदरातील फरक भरून नवीन पास तिकीट खिडकीवरुन काढता येणार आहे.

वाचाः ‘मुस्लिम राष्ट्रा’चे लक्ष्य! PFIचे ‘व्हिजन २०४७’ उघड; एनआयएच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर

पश्चिम रेल्वेवरील एसी लोकल फेऱ्यांना प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. १६ ऑगस्ट रोजी एसी लोकल फेऱ्यांनी एक लाख प्रवासी संख्येचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर देखील प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होत आहे. सध्या दररोज पश्चिम रेल्वेवर १३७५ लोकल फेऱ्या धावतात. यात एसी लोकल फेऱ्यांची संख्या ४८ इतकी असणार आहे. तर, मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या ५६ फेऱ्या चालवल्या जातात.

पास अपग्रेड कसा कराल

ज्या प्रवाशांनी फर्स्ट क्लासचा पास काढला आहे व ज्यांना एसी फेऱ्यातून प्रवास करण्याची इच्छा आहे. या प्रवाशांना या सुविधेचा फायदा होणार आहे. त्यासाठी साध्या लोकलमधील प्रथम श्रेणीतील मासिक पासधारक एसी लोकलचा पास काढण्यासाठी गेल्यास त्याला फरकाचे पैसे भरावे लागणार आहेत. त्यानंतर हा पास एसी लोकलचा पासमध्ये अपग्रेड होणार आहे. तसंच, या पासचे प्रवास केलेले दिवस वजा केले जाणार नाहीत.

वाचाः पुन्हा महाग होणार CNG-PNG; मुंबईत जास्त परिणाम, कारण काय?

हार्बर रेल्वेवर एसी लोकल नाही

हार्बर मार्गावर एकही एसी लोकल नसल्याने हार्बर मार्गावरील प्रथम श्रेणीतून प्रवास करणाऱ्या पासधारकांना या सुविधेचा कसलाही फायदा होणार नाही.

वाचाः शिवसेनेचा पलटवार! नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का; माजी नगरसेविकेने बांधले शिवबंधन, डझनभर नाराजही वाटेवर

Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: