योगेश बुऱ्हाणपुर येथे एका हॉटेलमध्ये काम करत होता. वेटरचे काम करत असताना त्याने स्वतःचा व्यवसाय उभा करायचा असं ठरवलं. त्यानंतर स्वतःच्या घराच्या गच्चीवर त्याने व्यवसायाची सुरुवात केली. घरापासूनच व्यवसायाची सुरुवात करत त्याने आज मोठ्या थाटात स्वतःची कंपनी उभी केली आहे. आता योगेश दुसऱ्यांना रोजगार देत आहे.
योगेशने घराच्या छतावरच एका छोट्याश्या कढईत केळ्यांचे वेफर्स तळून ते बाजारात विकण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने हा व्यवसाय पुढे नेण्याचा विचार केला. मात्र, भांडवल कसं गोळा करायचा हा प्रश्न होताच. त्यावेळत त्यांनी नामी शक्कल लढवत एक निर्णय घेतला. सरकारची आत्मनिर्भर भारत आणि आत्मनिर्भर मध्य प्रदेश या योजनांचा लाभ घेत त्याने लघु उद्योगाची सुरुवात केली.
वाचाः बीडमध्ये विवाहितेचा इच्छेविरुद्ध गर्भपात, पतीने दिल्या भलत्याच गोळ्या; धक्कादायक कारण समोर
केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेचा लाभ घेत योगेशला १४ लाखांचे लोन मिळाले. त्यात त्याने त्यांच्याकडे असलेले ३ लाख जमा केले. बँकेकडून कर्ज मिळाल्यानंतर त्याने चिप्स बनवण्यासाठी मशीन खरेदी केली आणि त्याचा व्यवसायाची व्याप्ती वाढवली. आजच्या घडीला योगेशच्या कंपनीचे केळ्याचे वेफर्सचा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पुरवठा होतो. देशातील असा एकही प्रदेश नाहीये जिथे त्याच्या कंपनीचे वेफर्सची विक्री होत नाही. त्याने तयार केलेल्या वेफर्सचं एक पाकिट १४० रुपये किमतीला विकले जाते.
वाचाः अल्पवयीन पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवल्यास…; हायकोर्टाने दिला मोठा निर्णय
प्रतिदिन २०० ते ५०० किलोपर्यंतची ऑर्डर तयार केली जाते. या वेफर्सची गँरटी २ महिनेपर्यंत आहे. योगेश आणि त्यांचा भाऊ अनिल हे महिन्याला जवळपास ७० हजार रुपये कमवतात. या व्यवसायामुळं त्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे. कधी काळी एका हॉटेलमध्ये नोकरी करणाऱ्या योगेशकडे आज चारचाकी गाडी आहे.
वाचाः १५० लोकांची करोडोंची फसवणूक करत संपवलं जीवन, पोलिस शोधत होते मृतदेह, नंतर समोर आलं वेगळेच सत्य