Mahavitaran additional security deposit bills to customers prepaid meter option; महावितरणकडून अतिरिक्त सुरक्षा ठेवींची बिलं, 'त्या' ग्राहकांना प्रीपेड मीटरचाही पर्याय

म. टा. प्रतिनिधी, पुणे :महावितरणने राज्यातील सर्व वीज ग्राहकांना एप्रिल महिन्यात वीज बिलांसोबत अतिरिक्त सुरक्षा ठेवींची बिले पाठविली असून, ती एकरकमी अथवा सहा मासिक हप्त्यांमध्ये भरता येणार आहे. आर्थिक अडचणींमुळे अतिरिक्त सुरक्षा ठेवींची बिले भरणे शक्य नसल्यास वीस किलोवॅटपेक्षा कमी जोडभार असलेल्या ग्राहकांना प्रीपेड मीटरच्या मागणीचा पर्यायही उपलब्ध आहे. प्रीपेड मीटरवर कोणतीही सुरक्षा ठेव भरावी लागत नाही; तसेच वीजदरात दोन टक्के सवलतही मिळते, अशी माहिती वीजतज्ज्ञांनी दिली.राज्यातील सर्व वीजग्राहकांना चालू वीजबिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव मागणीची संपूर्ण रकमेची बिले देण्यात आली आहेत. त्यावरून ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. वास्तविक महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या वीजपुरवठा संहितेनुसारच वीजग्राहकांकडून अतिरिक्त सुरक्षा ठेव आकारली जाते. यापूर्वी सुरक्षा ठेवीची रक्कम एका महिन्याच्या बिलाइतकी होती. मात्र, नवीन नियमांनुसार एप्रिल २०२२ पासून ती दुप्पट म्हणजे दोन महिन्यांच्या बिलाइतकी करण्यात आली आहे. त्यानुसार, गेल्या वर्षी एप्रिल २०२२ मध्येही अतिरिक्त सुरक्षा ठेव मागणीची बिले आली होती. त्यावेळी ज्यांनी भरणा केला नाही, त्यांना यंदाच्या वर्षी पुन्हा बिले पाठविण्यात आली आहेत.

‘राज्य वीज नियामक आयोगाने अतिरिक्त सुरक्षा ठेवींची बिले भरण्यासाठी सहा हप्त्यांची सवलत दिली आहे. महावितरणने वीजग्राहकांना दिलेल्या अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम सहा समान मासिक हप्त्यांमध्ये भरता येईल, अशी माहिती बिलामध्ये इंग्रजी भाषेत दिली आहे,’ असे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी सांगितले.

महाराष्ट्र भूषण सोहळा: सोलापूरच्या महिलेचा उष्माघाताने बळी, लेकीचा मृतदेह पाहून आईचा हंबरडा

प्रीपेड मीटरसाठी सुरक्षा ठेव आवश्यक नाही

‘अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम एकरकमी किंवा सहा मासिक हप्त्यांमध्ये भरणे शक्य नाही, अशा ग्राहकांसाठी प्रीपेड मीटरचा पर्यायही उपलब्ध आहे. प्रीपेड मीटरसाठी सुरक्षा ठेव आवश्यक नाही. मात्र, वीस किलोवॅटपेक्षा कमी जोडभार असलेल्या ग्राहकांनाच प्रीपेड मीटरसाठी अर्ज करता येणार आहे. अशा वीजग्राहकांनी प्रीपेड मीटर घेतल्यास, सध्याची जमा सुरक्षा अनामत रक्कम त्यांच्या प्रीपेड खात्यामध्ये वर्ग केली जाईल. त्यातून त्यांच्या पुढील वीज वापराची रक्कम वजा केली जाते, तसेच वीज आकार व इंधन समायोजन आकारात अतिरिक्त दोन टक्के वीजदर सवलतही मिळते,’ असेही त्यांनी सांगितले.

आधी इंग्रजीत सुनावलं, महावितरणही हादरलं, आज वीज कनेक्शन मिळालं, इंग्रजीतूनच अभिनंदन केलं!

प्रीपेड मीटरसाठी इथे करा अर्ज

‘प्रीपेड मीटरसाठी वीस किलोवॅटपेक्षा कमी जोडभार असलेल्या वीजग्राहकांना संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे अर्ज करता येईल. संबंधित कार्यालयाकडून अर्जावर सही शिक्क्याची पोचपावती घ्यावी. त्यानंतर महावितरण अतिरिक्त सुरक्षा ठेवींसाठी सक्ती करू शकत नाही. बिले भरण्यासाठी कोणता पर्याय निवडायचा हा वीजग्राहकांचा हक्क असून, महावितरणला ग्राहकांची कोणत्याही पर्यायाची मागणी नाकारता येणार नाही,’ असे वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी सांगितले.
जेवून घ्या रे, महाराष्ट्र भूषण सोहळ्यातून आईचा फोन; लेकरं शोधत राहिली, माऊली परतलीच नाही

Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: