maharashtra weather news, Weather Alert : महाराष्ट्रावर ४८ तास अस्मानी संकट, मुंबईत यलो तर 'या' जिल्ह्यांना तुफान पावसाचा इशारा - weather alert 48 hour heavy rain alert to maharashtra stormy rain warning to mumbai pune vidarbha marathwada

मुंबई : राज्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने आता परतीचा मार्ग धरला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये धुवांधार पाऊस झाला. शुक्रवारीदेखील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याचे पाहायला मिळालं. हाच पाऊस आता पुढच्या दोन-तीन दिवस राहणार असल्याची माहिती आहे.

इतकंच नाही तर राज्यासाठी पुढचे ४८ तास महत्त्वाचे असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. पुढच्या ४८ तासांत मुंबईसह इतर महत्त्वाच्या भागांमध्ये आणि घाटमाथावर मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे या भागांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह उपनगर आणि आजूबाजूच्या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली.

Nashik Accident : …म्हणून बघत बसण्याशिवाय पर्याय नव्हता, नाशिक दुर्घटनेत प्रत्यक्षदर्शींकडून धक्कादायक खुलासा

आज म्हणजे ८ ऑक्टोबर रोजी मुंबईला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढच्या दोन-तीन दिवसांमध्ये राज्यभर ढगाळ वातावरण राहील तर ११ आणि १२ ऑक्टोबर रोजी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वरतवण्यात आली आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

एसटी महामंडळाकडून सर्व प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना, बसमध्ये बसण्याआधी नक्की वाचा ही बातमी…

Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: