पहिल्यांदा हा जीवाणू लंडनमध्ये १९८० मध्ये सापडला होता. परंतु, हा रोग शोधण्यासाठी २०१९ मध्ये अमेरिकेत प्रथमच चाचणी सुरू करण्यात आली. ही चाचणी सध्या अमेरिकेपुरती मर्यादित आहे. याचाच अर्थ हा जीवाणू जगाच्या कोणत्या देशात पसरला आहे याबद्दल शास्त्रज्ञांनाही खात्री नाही.
काय म्हणतात शास्त्रज्ञ…
काही संशोधनात, यूएस मध्ये १०० पैकी एका व्यक्तीला M.Genetalium ची लागण झाल्याचे आढळून आले. पण शास्त्रज्ञ म्हणतात की, लोकांमध्ये त्याचा प्रसार खूप जास्त आहे. या संसर्गामुळे वंध्यत्व, अकाली जन्म, गर्भपात, गर्भाशयाची जळजळ आणि अनेक संबंधित आजारांचा धोका वाढतो.
शास्त्रज्ञ अधिक चिंतित आहेत की, हे जीवाणू लैंगिक संक्रमित रोगांवर उपचार करण्यासाठी अजिथ्रोमाइसिन, क्विनोलॉन्स, मॅक्रोलाइड्स आणि डॉक्सीसायक्लिन या सामान्यतः वापरल्या जाणार्या औषधांचा प्रतिकार करत आहेत, ज्यामुळे उपचार करणे कठीण होऊ शकते. इतर उपचार पर्याय देखील उपलब्ध आहेत. परंतु, त्यांचे देखील दुष्परिणाम आहेत. जे गर्भवती महिलांसाठी अजिबात वापरता येत नाहीत. हे जीवाणूही त्या औषधांसमोर सहज टिकून आहेत. सुपरबग्समुळे होणाऱ्या आजारांमुळे जगात दरवर्षी ७० लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. जागतिक तापमानवाढीप्रमाणे याकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कोणताही संकेत न देता हळूहळू पडतो आजारी
M Gen मुळे बहुतेक प्रकरणांमध्ये कोणतीही लक्षणे उद्भवत नाहीत आणि तो अनेक वर्षे लोकांमध्ये राहू शकतो. परंतु इतर लैंगिक संक्रमित रोगांपेक्षा तो अधिक धोकादायक आहे. त्याची लक्षणे त्वरीत दिसत नसल्यामुळे त्याचे उपचार करणे देखील अवघड आहे. M. Gen मुळे पुनरुत्पादक भागांमध्ये रक्तस्त्राव, सूज आणि वेदना होऊ शकतात. याव्यतिरिक्त, यामुळे महिलांमध्ये वंध्यत्व देखील येऊ शकते.
माणसापासून माणसात पसरतो का?
तज्ञांचे म्हणणे आहे की, हा संसर्ग स्त्री आणि पुरुष यांच्यातील नातेसंबंधादरम्यान प्रसारित होऊ शकतो आणि तो जन्मापूर्वी आईकडून मुलाकडे देखील जाऊ शकते.
सुपरबग्समुळे होतात हे आजार…
२०२१ मध्ये यूएसमध्ये झालेल्या १० हून अधिक संशोधनांमध्ये असे आढळून आले की, या सुपरबगमुळे अकाली जन्माचा धोका वाढतो. त्याच वेळी, पुरुषांमध्ये या संसर्गामुळे, लघवीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. यामुळे स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही असामान्य स्त्राव होण्याची समस्या उद्भवू शकते. तर मानवांमध्ये याच्या दीर्घकालीन दुष्परिणामांवर अजून संशोधन केले जात आहे.