kirit somaiya, किरीट सोमय्यांनी रश्मी ठाकरेंच्या १९ बंगल्यांचं प्रकरण पुन्हा उकरून काढलं, पोलीस कारवाईसाठी पहिलं पाऊल - bjp leader kirit somaiya file complaint against uddhav thackeray wife rashmi thackeray regarding 19 bungalows in alibag

Rashmi Thackeray bungalow in Alibaug | अलिबागच्या कोर्लई येथील जागेवर २००९ मध्ये १८ घरे होती. तशी नोंदणी झाली होती. अन्वय नाईक यांनी २००९ मध्ये रिसॉर्ट बांधण्याची परवानगी मागितली होती. कच्ची घरे होती. रिसॉर्टची परवानगी त्यांना मिळाली नाही. २०११-१२ मध्ये त्यांनी तेथील घरे पाडून तिथे झाडे लावली होती. त्यानंतर २०१४ मध्ये ती जागा मनिषा वायकर आणि रश्मी ठाकरे यांना विकली, असा आरोप आहे.

 

रश्मी ठाकरे आणि किरीट सोमय्या

हायलाइट्स:

  • अलिबागमधील १९ बंगल्यांच्या प्रकरणाचा पुन्हा एकदा तपास
  • रेवदंडा पोलीस ठाण्यात रश्मी ठाकरे यांच्याविरोधात सोमय्यांची तक्रार
  • रश्मी ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल होणार?
अलिबाग: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या कथित मालकीच्या अलिबाग येथील १९ बंगल्यांचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यापूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरे यांच्या १९ बंगल्यांचे प्रकरण लावून धरले होते. तेव्हा उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेत्यांनी या आरोपांचा इन्कार केला होता. मध्यंतरी या प्रकरणाविषयी सर्वचजण मौन बाळगून होते. मात्र, आता शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर अलिबागमधील १९ बंगल्यांच्या प्रकरणाचा पुन्हा एकदा तपास सुरु झाला आहे. किरीट सोमय्या यांनी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी रेवदंडा पोलीस ठाण्यात जाऊन रश्मी ठाकरे यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे आता पोलीस याप्रकरणात रश्मी ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करतात का, हे पाहावे लागेल. तसे घडल्यास ठाकरे कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Raigad : कोर्लईत १९ बंगले नाहीत!, सरपंचांनी सांगितलं नेमकं काय आहे प्रकरण
पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, येत्या काही दिवसांमध्ये रेवदंडा पोलीस ठाण्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अहवाल दिला जाईल. त्यानंतर येत्या सात दिवसांत रश्मी ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल होईल, असे आश्वासन मला देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनीच रश्मी ठाकरे यांच्या मालकीचे १९ बंगले रेकॉर्डवरुन गायब केले. मुख्यमंत्री कार्यालयाने यासाठी संबंधित यंत्रणेवर दडपण आणले. अधिकारी किरण पाटील यांना उद्धव ठाकरे यांनी १३ वर्षांमधील बंगल्यांचा तपशील नष्ट करण्याचे आदेश दिले. किरण पाटील हे सरकारी अधिकारी असूनही मातोश्रीसाठी काम करत होते. रश्मी ठाकरे यांनी १३ वर्षे या बंगल्यांसाठीची घरपट्टी भरली होती. परंतु, ठाकरे सरकारच्या काळात हे प्रकरण दडपण्यात आले, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.

जो बायकोचा नाही होऊ शकला तो महाराष्ट्राचा काय होणार?’; सोमय्यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
मात्र, शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर पहिला अहवाल आला त्यामध्ये जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीने रश्मी ठाकरे यांच्या मालकीचे १९ बंगले असल्याची बाब कबूल केली. २०२२ मध्ये दबावामुळे आम्ही १९ बंगल्यासंदर्भातील तपशील मिटवल्याची कबुली त्यांनी दिली, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला. रश्मी ठाकरे यांच्या या व्यवहाराची चौकशी व्हायला हवी अशी मागणी आम्ही करणार आहोत. ज्याप्रमाणे अनिल परब यांच्या रिसॉर्टची चौकशी झाली आणि कारवाई करण्यात आली. तशीच कारवाई रश्मी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात करण्यात यावी अशी आमची मागणी आहे, असेही सोमय्या यांनी सांगितलं.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: