imtiaz jaleel, शिरसाटांना थांबवणाऱ्या जलील यांची मानापमान नाट्यावर प्रतिक्रिया; म्हणाले, खैरे तर... - maharashtra politics news aurangabad mim mp imtiaz jaleel reacts on shivsena mla sanjay shirsat upset about chandrakant khaire


औरंगाबाद : शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचा आधी सत्कार केल्यामुळे शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) नाराज झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यानंतर औरंगाबदचे एमआयएम खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत खैरे ज्येष्ठ नेते आहेत, माझ्या मनात त्यांच्याविषयी आदर आहे. मी खासदार असताना माझ्या आधी खैरेंचा सत्कार केला असता, तर मी त्याला विरोध केला नसता, असं जलील म्हणाले.

इम्तियाज जलील नेमकं काय म्हणाले?

एखाद्या पक्षातील ज्येष्ठ नेत्याचा सत्कार आधी केला, म्हणून त्याला विरोध करणं चुकीचं आहे. कालचा प्रकार दुर्दैवी होता. मी खासदार असताना माझ्या आधी चंद्रकांत खैरे यांचा सत्कार झाला असता, तरी मी विरोध केला नसता, अशी भूमिका इम्तियाज जलील यांनी मांडली.

करोनानंतर आपण सार्वजनिक सण, उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतोय. अशा आनंदाच्या क्षणी मी मोठा, तो लहान असे प्रकार घडणे दुर्दैवी आहे. पोलिस आयुक्तांनी बोलावलेल्या बैठकीत आपण कुणी खासदार, आमदार, मंत्री म्हणून नाही, तर सामान्य नागरिक म्हणून सहभागी झालोत हे लक्षात ठेवायला हवे होते. आमदार संजय शिरसाट यांच्या आधी चंद्रकांत खैरे यांचा सत्कार केला तर यात नाराज होण्यासारखे काय? असा सवालही जलील यांनी विचारला.

हेही वाचा : शिंदे गटातील आमदाराचं सूचक वक्तव्य, उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढणार?

चंद्रकांत खैरे शिवसेनेतील ज्येष्ठ नेते आहेत, चार वेळा खासदार राहिलेले आहेत. मी त्यांचा नेहमीच आदर करत आलो आहे. त्यामुळे त्यांचा सत्कार आधी केला म्हणून रुसणे योग्य नव्हते. व्यासपीठावर झालेला प्रकार दुर्दैवी होता. खैरेंचा आधी सत्कार केला म्हणून मला वाईट वाटलं नसतं किंवा मी विरोधही केला नसता, असं इम्तियाज जलील म्हणाले.

हेही वाचा : हिंदूंचे सण आले की निर्बंध, बाकीच्या सणांना रिलॅक्स, श्रीकांत शिंदेही ठाकरेंवर बरसले

नेमकं काय घडलं होतं?

पोलीस आयुक्तालयाच्या वतीने गणोशोत्सवपूर्वी प्रथेप्रमाणे आयोजित समन्वय बैठकीत राजकीय नेत्यांच्या मानपमानाचे नाट्य पाहायला मिळाले. शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा अगोदर सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर उपस्थित असलेले शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट चिडले.

हे प्रोटोकॉल नुसार चुकीचे असल्याचे म्हणत खुर्चीवरून उठत कार्यक्रम सोडून शिरसाट निघाले होते.दरम्यान बाजूलाच बसलेल्या एम.आय.एम. पक्षाचे खासदार इम्तियाज जलील त्यांचा हात धरून रोखले व त्या नंतर शिरसाट यांचा सत्कार करण्यात आला. पोलीस आयुक्तालायच्या वतीने आयोजित कार्यक्रमात झालेल्या नेत्यांच्या रुसवे फुगव्याची मात्र जोरदार चर्चा शहरात सुरु आहे.

हेही वाचा : भास्कर जाधवांनी इशारा देताच गुलाबराव तुटून पडले; म्हणाले, शिवसेना कोणाची आहे, यापेक्षा…Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: