bomb blast in mosque in Kabul


अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील एका मशिदीत बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात २० जणांचा मृत्यू तर ४० जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये ५ लहान मुलांचा समावेश आहे. काबूलच्या पीडी १७ येथील मशिदीत बॉम्बस्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले असून सर्व जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे. अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

काबूलच्या इमरजेंसी रुग्णालात जखमींवर उपचार सुरू

काबूलच्या इमरजेंसी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार ट्विटरवर स्फोटात जखमी झालेल्या सात वर्षांच्या मुलासह २७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. रुग्णालयाने याबाबत ट्वीटही केले आहे.

The injured are being treated at Kabul's emergency hospital
काबूलच्या इमरजेंसी रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु

नमाजामुळे मशिदीत खूप गर्दी

संध्याकाळी उशिरा स्फोट झाला तेव्हा मशिदीमध्ये मगरीबची नमाज अदा केली जात होती. त्यामुळे तेथे मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे मृतांचा आकडा जास्त असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा स्फोट इतका भयानक होता की, स्फोटानंतर मशिदीच्या आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचाही तुटल्या. काबूल पोलिसांचे प्रवक्ते खालिद जद्रान यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटानंतर सुरक्षा दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचले असले असून मृतांच्या संख्येबाबत अद्याप पृष्टी करण्यात आली नाही.

यापूर्वीही अफगाणिस्तान अनेकदा बॉम्बस्फोट

अश्रफ घनी यांचे सरकार हटवल्यानंतर अफगाणिस्तानवर तालिबान सरकारने ताबा मिळवला होता. तालिबान सरकारला आत्ता एक वर्ष पूर्ण झाले आहे. अफगाणिस्तानमध्ये गेल्या अनेक महिन्यांमध्ये असे अनेक हल्ले करण्यात आले आहेत. मुख्य करुन सिया मशिदींना यात लक्ष्य करण्यात आले आहे. २९ एप्रिल रोजी, काबूलमधील मशिदीमध्ये धार्मिक विधी करत असलेल्या अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांना लक्ष्य करण्यात आलेल्या हल्ल्यात १० लोक मारले गेले होते. मात्र, आज ज्या भागात हा स्फोट झाला त्या भागात शिया लोकसंख्या नसल्याचे समोर आले आहे.

Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: