Astro-new


Today Rashi Bhavishya, 03 October 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष (Aries Horoscope Today ):-

घेतलेल्या निर्णयावर ठाम रहा. घाईने कामे उरकू नका. सहकार्‍यांच्या हातात हात घालून चला. टाकलेले पाऊल मागे घेऊ नका. गुरुतुल्य व्यक्तीकडून प्रेरणा मिळेल.

वृषभ (Taurus Horoscope Today ):-

अकारण पैसा खर्च होऊ शकतो. दिवस उर्जावर्धक राहील. कष्टाला पर्याय नाही. कामे गतीने पूर्णत्वास जातील. मेहनतीचे योग्य फळ मिळेल.

मिथुन (Gemini Horoscope Today ):-

मित्रांमध्ये गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. खाण्यापिण्याची चंगळ राहील.  जवळचा प्रवास चांगला राहील. कामाचा अधिक भार येऊ शकतो. जोडीदाराच्या प्रगल्भतेचे कौतुक कराल.

कर्क (Cancer Horoscope Today ):-

उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. चटपटीत पदार्थ खाल. हातातील अधिकार योग्य वेळी वापरा. नातेवाईकांची गाठ पडेल. जोडीदाराच्या भावना लक्षात घ्या. 

सिंह (Leo Horoscope Today ):-

जोडीदाराचा सल्ला उपयोगी पडेल. व्यायामाचा कंटाळा करू नका. भावंडांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. दिवस आपल्या इच्छेप्रमाणे घालवाल.

कन्या (Virgo Horoscope Today ):-

आपल्या कामात यश मिळेल. नियोजनबद्ध कामे कराल. आवडीची कामे करण्यावर भर द्याल. मनातील निराशाजनक विचार काढून टाका. जोडीदाराशी समजूतदारपणे वागा.

तूळ (Libra Horoscope Today ):-

कौटुंबिक खर्च निघतील. कामाची क्रमवारी ठरवा. बोलण्यातून लोकनवरती प्रभाव पाडाल. झोपेची तक्रार जाणवेल. समस्यांना संयमाने तोंड द्या.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):-

लोक तुमचा सल्ला विचारायला येतील. अधिकार्‍यांच्या सल्ल्याने वागा. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. फक्त कामावरच लक्ष केद्रिंत करा. आर्थिक चिंता मिटेल.

धनू (Sagittarius Horoscope Today ):-

मदत केल्याचा आनंद मिळवाल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. परोपकाराची भावना जोपासाल. तरुणांच्या सहवासात रमाल. विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील.

मकर (Capricorn Horoscope Today ):-

नोकरीत सांभाळून निर्णय घ्या. कमिशन च्या व्यवसायात चांगली कमाई कराल. धार्मिक भावना वाढीस लागेल. गरज नसेल तर प्रवास टाळावा. भावंडांशी मतभेद टाळा.

कुंभ (Aquarius Horoscope Today ):-

मनातील निर्णय जोडीदारासमोर मांडा. तिखट शब्दांचा वापर टाळा. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. जुन्या विचारांना चिकटून राहू नका.

मीन (Pisces Horoscope Today ):-

क्षुल्लक गोष्टी नजरेआड करा. जोडीदाराशी शांतपणे वार्तालाप करा. अती उत्साह दाखवायला जाऊ नका. योग्य संधीची वाट पहावी. उष्णतेचे त्रास संभवतात.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: