‘जे काही करायचं आहे ते मी छातीठोकपणे समोर जाऊन करतो’
माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर दोन दिवसांपूर्वी ईडीची धाड पडली. यावेळी हसन मुश्रीफ हे कामानिमित्त बाहेरगावी होते. तर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते. यावेळी हसन मुश्रीफ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना शांततेचा आवाहन केलं होतं. तसेच यामागे कागलमधील भाजप नेत्याचा हात असून त्यांच्या दिल्लीवाऱ्या सुरू आहेत, असं म्हणत नाव न घेता भाजप जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांच्यावर टीका केली होती. याला आता समरजीतसिंह घाटगे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर पडलेल्या धाडीची माहिती मला माध्यमांमधून समजली. यावेळी मी माझ्या वेगळ्या कामानिमित्त दिल्लीमध्ये होतो. याबाबत मला काहीही माहित नव्हतं. तरीही हसन मुश्रीफ नेहमीप्रमाणे मोर्चा काढला, कुटुंबाला त्रास होतो म्हणायचं आणि नेहमी ठरलेली स्क्रिप्ट वाचायची आणि तेच आरोप माझ्यावर करायचे. पण जे काही करायचं आहे, ते मी छातीठोकपणे समोर जाऊन करतो. मी समोरून वार करतो, हसन मुश्रीफ यांच्यासारखं पाठीत खंजीर खुपसत नाही. हसन मुश्रीफ साहेब तुमचे काळीज वाघाचे असेल, तुमच्यात पुरुषार्थ असेल तर आता जात आणि धर्माच्या मागे का लपता? जर काही केलं नसेल तर भीती कशाला वाटते. जातीच्या मागे लपून राजकारण करतो तो माणूस जातीयवादी असतो हे मुश्रीफ यांनी स्वतः सिद्ध केलंय, असा टोलाही घाटगे यांनी लगावला.
कोल्हापूर, पुण्यात ईडीचे छापे; हसन मुश्रीफ बोलले, ‘ब्रिस्क कंपनीशी दुरान्वयेही संबंध नाही’
‘हसन मुश्रीफ यांना झोपताना आणि स्वप्नातही समरजीतसिंह घाटगे आणि त्यांचे कार्यकर्ते दिसत आहेत’
तसेच हसन मुश्रीफ हे स्वतःला नवाब मलिक यांच्या पंगतीत बसवून घेतले आहेत. नवाब मलिक यांच्यावर वेगळे आरोप आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला किरीट सोमय्या यांनी अनेक नेत्यांची नावं आपल्या ट्विटमध्ये घेतली आहेत. मात्र मुश्रीफ यांना केवळ नवाब मलिक यांचा पुळका का येतोय. नवाब मलिक आणि त्यांचे जवळचे काही संबंध आहेत का? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला आहे. तसेच हसन मुश्रीफ यांना झोपताना आणि स्वप्नात देखील समरजित घाटगे आणि त्यांचे कार्यकर्ते दिसत आहेत. मला किरीट सोमय्या यांच्या मागे लपण्याची गरज नाही. मला जे करायचं असेल तर समोर येऊन करेन. माझ्यावर बालिश आरोप करून मुश्रीफ साहेब स्वतःचं हसं करून का घेत आहेत? असंही समरजीतसिंह घाटगे यावेळी म्हणाले.
विशिष्ट जातीधर्माच्या लोकांना टार्गेट करण्याचे षडयंत्र; ईडीच्या छाप्यानंतर हसन मुश्रीफांची