Good News For Mumbaikar Madhya Vaitarna Dam Will Full Soon; मध्य वैतरणाही लवकरच काठोकाठ भरणार, भातसा धरणाची काय स्थिती, मुंबईकरांसाठी मोठी अपडेट

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र मागील १५ दिवसांतील जोरदार पावसाने तलावातील पाणीसाठा ७५ टक्क्यांवर म्हणजे सुमारे ११ लाख दशलक्ष लिटरपर्यंत पोहोचला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या तलावांपैकी एक असलेला मध्य वैतरणा तलावही आता भरत आला आहे. यातील पाणीसाठा सुमारे ९१.५६ टक्के झाला आहे.

सन २०२२च्या तुलनेत तलाव क्षेत्रात यंदा कमी पाऊस झाला आहे. मात्र, गेल्या पंधरवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे तलावांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. पावसाचे अजून दोन महिने शिल्लक असल्यामुळे सर्व तलाव भरतील, असा विश्वास पालिकेच्या जलअभियंता विभागाने व्यक्त केला.

सातही तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. सध्या १० लाख ९३ हजार ३७९ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. त्यामुळे अजून साडेतीन लाख दशलक्ष लिटरपेक्षा जास्त पाणीसाठ्याची आवश्यकता आहे.

आतापर्यंत पाच महत्त्वाच्या आणि मोठी जलसंधारण क्षमता असलेल्या तलावांपैकी तानसा व मोडकसागर हे दोन तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. त्याशिवाय संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तुळशी व विहार हे दोन लहान तलावही वाहू लागले आहेत. ठाणे जिल्ह्यातील मध्य वैतरणा तलावातील पाणीसाठा सुमारे एक लाख ७७ हजार दशलक्ष लिटरवर आहे. या तलावाची एक लाख ९३ हजार दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे.

Monsoon Update : ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मान्सूनचा जोर कसा असणार? IMD कडून अपडेट, जुलैमध्ये पाऊस वाढला कारण..

भातसा ६८ टक्क्यांवर

भातसा तलावातील पाणीसाठा ६८ टक्क्यांवर पोहोचला आहे. हा तलाव पूर्ण भरणे मुंबईकरांसाठी महत्त्वाचे आहे. तलावाची पूर्ण भरून वाहण्याची क्षमता सात लाख १७ हजार दशलक्ष लिटर इतकी आहे. सध्या यात चार लाख ८९ हजार ६२२ दशलक्ष लिटर साठा आहे. या तलावातून मुंबईला दररोज एक हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. हा तलाव ७५ टक्के भरल्यास मुंबईतील १० टक्के पाणीकपात पालिका मागे घेण्याची शक्यता आहे.

भीमाशंकरला जाताय? जरा थांबा… रस्ता खचला, भगदाड पडलं, प्रशासनाकडून महत्त्वाची अपडेट

जलसाठ्याची सद्यस्थिती

तलाव-साठा (दशलक्ष लिटर)-टक्के

अप्पर वैतरणा-१,१७,३७८-५१.७०

मोडक सागर-१,२८,९२५-१००

तानसा-१,४५,०८०-१००

मध्य वैतरणा-१,९३,५३०-९१.८९

भातसा-४,८९,६१२-६८.२८

विहार-२७,६९८-१००

तुळशी-८,०४६-१००
महिन्याच्या पहिल्याच दिवशी खुशखबर! व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती झाल्या कमी, आजपासून मिळणार फक्त…

Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: