fir against chhagan bhujbal, छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ; चेंबुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण? - fir against ex-maha minister chhagan bhujbal, 2 others for threatening to kill man

मुंबईः महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भुजबळ व अन्य दोन जणांविरोधात मुंबईतील चेंबूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंडसहिता कलम ५०६ अंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छगन भुजबळ यांच्यासह अन्य दोघांविरोधात धमकी दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेंबूरचे व्यापारी ललित टेकचंदानी यांनी चेंबूर पोलिसात फिर्याद दिली आहे. जीवे मारण्याची धमकी देणारा अज्ञात फोन आला होता, असं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

छगन भुजबळ यांना मोबाईलवर दोन व्हिडिओ पाठवले होते. ज्यात भुजबळांनी हिंदू धर्माचा अपमान करणारे भाषण केले होते. त्यानंतर टेकचंदानी यांना धमक्या देणारे व्हॉट्सअॅप कॉल आणि मेसेज करण्यात आले. तसंच, शिवीगाळ सुद्धा करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यानंतर ललितकुमार टेकचंदानी यांनी चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

वाचाः मुंबईकरांसाठी मोठी बातमी; रिक्षा-टॅक्सी भाडे आजपासून वाढणार

दरम्यान, छगन भुजबळ यांनी केलेल्या एक वक्तव्यामुळं ते अडचणीत सापडले आहेत. शाळेत महापुरुषांचे फोटो लावले पाहिजेत. त्याऐवजी शाळेत सरस्वती आणि शारदा मातेचे फोटो का लावले जातात, असा सवाल त्यांनी केला होता. शाळांमध्ये सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेबांचा फोटो लावा, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा फोटो लावा. पण, सरस्वतीचा, शारदा मातेचा फोटो लावला जातो. त्यांना आम्ही काही पाहिले नाही. त्यांनी आम्हाला काही शिकवले नाही. त्यांनी ‘तीन टक्के’ लोकांना शिकवले. आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवले त्यांची पूजा कशासाठी करायची,’ असा प्रश्न भुजबळ यांनी केला होता.

वाचाः शिवसेना- शिंदे गटात टीझर वॉर; शिंदे गटाच्या झेंड्यात बाळासाहेब आणि दिघेंचे छायाचित्र

फडणवीसांचं भुजबळांना उत्तर

शाळांमधील सरस्वती देवीचे छायाचित्र कोणत्याही परिस्थितीत हे सरकार हटविणार नाही. महापुरूषांचे फोटो लावा ही मागणी करताना सरस्वतीचे छायाचित्र हटविण्याची मागणी करण्याचे कारण काय, असा सवाल करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छायाचित्र काढण्याची मागणी फेटाळून लावली. सरस्वती ही विद्येची,कलेची देवता आहे. आमच्या संस्कृतीत सरस्वतीचा मान आहे. ज्याला भारतीय संस्कृती,परंपरा मान्य नाहीत, हिंदुत्व मान्य नाही अशीच व्यक्ती असे बोलू शकते. महापुरुषांचे फोटो तर लावलेच पाहिजेत. प्रत्येक शाळेत तर ते लावले जातातच. मात्र आमचे सरकार कोणत्याही परिस्थितीत सरस्वती देवीचे फोटो हटविणार नाही, असे फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

वाचाः नाशिकमधील फर्निचर व्यावसायिकाचा खुनाचे गूढ उकलले; २३ दिवसांनी सत्य समोर

Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: