eknath shinde news today, शिंदेंनी संजय राऊतांच्या दाढीवर हात ठेवला असता तर...; गुलाबराव पाटलांची राऊतांवर विखारी टीका - gulabrao patil criticism of sanjay raut jalgaon news

Maharashtra Political News : मंत्री गुलाबराव पाटील यांनी अप्रत्यक्षरीत्या एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्या कानशिलात लगावले असती असा उल्लेख करत आव्हान दिले आहे, यामुळे एकच राजकीय गदारोळ उडाला असून यावर आता काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

 

जळगाव : शिंदे गटाच्या आमदारावर सातत्याने टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी जहरी शब्दात टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्या दाढीवर नुसता हात ठेवला असता तर संजय राऊत खासदार नाही झाला असता, आडवा पडला असता असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे असून एकेरी भाषेत उल्लेख करत आव्हान दिले आहे. यातून एक प्रकारे मंत्री गुलाबराव पाटील यांनी अप्रत्यक्षरीत्या एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्या कानशिलात लगावले असती असा उल्लेख करत आव्हान दिले आहे.

लव्ह जिहाद संदर्भात स्वतंत्र कायदा करावा यासह विविध मागण्यांसाठी आज जळगावत हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला मंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनोगतात म्हणजे गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर तसेच संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

नारायण राणेंनी खळबळजनक दावा केला, मात्र भेटीबद्दल संजय राऊतांनी एकाच वाक्यात विषय संपवला!
अनेकजण आमच्यावर टीका करत आहेत. मात्र, आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी बाहेर पडलो असल्यास मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं. संजय राऊतसुद्धा आमच्यावर टीका करत आहेत. महापुरुषांबद्दल काहीतरी बोलता येते. मात्र, मी खोलात जाणार नाही असे म्हणत संजय राऊत यांच्या नुसत्या दाढीवर जर एकनाथ शिंदेंनी हात ठेवला असता तर खासदार झाला नसता, आडवा पडला असता असा एकही उल्लेख करत मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर विखारी टीका केली आहे. त्यांना जे ४१ मते पडले ना ते असं केल्यामुळे पडले, हे सांगताना गालावर हात ठेवून मंत्री गुलाबराव पाटील यांनी नक्कल करत संजय राऊत यांच्यावर घणाघात केला आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

By jaghit