dhanushyabaan logo, Milind Narvekar: 'अष्टपैलू' नार्वेकरांच्या टी-शर्टवर झळकला धनुष्यबाण, राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण - dhanushyabaan logo on milind narvekar t shirt starts new political debate about joining bjp or eknath shinde camp

Maharashtra Politics | एकीकडे ठाकरे गटाकडून ‘मशाली’चा जोरदार प्रचार असताना मिलिंद नार्वेकरांच्या टी-शर्टवरील धनुष्यबाण पक्षाच्या भूमिकेशी फारकत घेणारा आहे का, असा प्रश्न अनेकांकडून विचारला जात आहे. त्यामुळे मिलिंद नार्वेकर खरोखरच शिंदे गटाच्या सामील होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत का, याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. मिलिंद नार्वेकर शिंदे गटाच्या अधिक जवळ?

मिलिंद नार्वेकर

हायलाइट्स:

  • आयोगाने ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिले होते
  • नार्वेकरांच्या टी-शर्टवर मात्र धनुष्यबाण
  • मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार?
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा असलेले उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. मिलिंद नार्वेकर यांनी नुकताच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) सदस्यपदाची निवडणूक विक्रमी मतांनी जिंकली होती. त्यानंतर मराठी वृत्तपत्रांमध्ये मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्या अभिनंदनाच्या जाहिराती झळकल्या होत्या. यामध्ये मिलिंद नार्वेकर यांचा टी-शर्ट सध्या प्रचंड चर्चेचा विषय झाला आहे. नार्वेकरांच्या या टी-शर्टवर धनुष्यबाणाचे चिन्ह आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले होते. तरीही मिलिंद नार्वेकर यांच्या टी-शर्टवर धनुष्यबाण कसा, यावरुन निरनिराळ्या चर्चा सुरु आहेत.

धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिले होते. त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांच्या टी-शर्टवर मशाल चिन्ह असणे अपेक्षित होते. मात्र, मिलिंद नार्वेकर यांच्या चाहत्यांनी अतिउत्साहाच्या भरात मशालीऐवजी धनुष्यबाण हेच चिन्हा वापरले. याशिवाय, मिलिंद नार्वेकर यांना शुभेच्छा देण्यासाठी देण्यात आलेल्या जाहिरातीमधील मजकूरही रंजक आहे. एमसीएच्या सर्वोच्च कार्यकारिणीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सर्वाधिक मतांनी जिंकलेले ‘अष्टपैलू’ मिलिंद नार्वेकर यांचे अभिनंदन, असे या जाहिरातीत म्हटले आहे. एकीकडे ठाकरे गटाकडून ‘मशाली’चा जोरदार प्रचार असताना मिलिंद नार्वेकरांच्या टी-शर्टवरील धनुष्यबाण पक्षाच्या भूमिकेशी फारकत घेणारा आहे का, असा प्रश्न अनेकांकडून विचारला जात आहे. त्यामुळे मिलिंद नार्वेकर खरोखरच शिंदे गटाच्या सामील होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत का, याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.
हसतमुख आदित्य ठाकरे, गोंधळलेले मिलिंद नार्वेकर, ‘मातोश्री’वर घडलं काय?

मिलिंद नार्वेकरांच्या अमित शाहांना शुभेच्छा

भाजप आणि ठाकरे गटातील संघर्ष कधी नव्हे इतका शिगेला पोहोचला असतानाच मिलिंद नार्वेकर यांनी रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. एमसीए निवडणुकीच्या मतदानाला ठाकरे कुटुंबातील कोणीही हजेरी लावली नव्हती. तरीही मिलिंद नार्वेकर २२१ मतांसह नार्वेकर विजयी झाले. अपेक्स काऊन्सिलच्या उमेदवारांमध्ये नार्वेकरांना मिळालेली ही सर्वाधिक मतं आहेत. या विजयानंतर मिलिंद नार्वेकर यांनी लगेचच अमित शाहांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या होत्या.

दरम्यान, या सगळ्या घटनाक्रमानंतर मिलिंद नार्वेकर यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. दिवाळीच्या निमित्ताने ही सदिच्छा भेट झाल्याचं बोललं जात आहे. तसंच एमसीए निवडणुकीत नार्वेकरांनी विजय मिळवल्याबद्दल ठाकरेंकडून त्यांचं अभिष्टचिंतन करण्यात आल्याचीही माहिती आहे. या भेटीचे फोटो समोर आले असून सारं काही आलबेल असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न यातून होताना दिसत आहे.

अजित पवारांची फडणवीसांसोबत चर्चा; तर निरोपासाठी आलेल्या नार्वेकरांना शरद पवारांनी गाडीत बसवलं!
दरम्यान, या सगळ्या घटनाक्रमानंतर मिलिंद नार्वेकर यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. दिवाळीच्या निमित्ताने ही सदिच्छा भेट झाल्याचं बोललं जात आहे. तसंच एमसीए निवडणुकीत नार्वेकरांनी विजय मिळवल्याबद्दल ठाकरेंकडून त्यांचं अभिष्टचिंतन करण्यात आल्याचीही माहिती आहे. या भेटीचे फोटो समोर आले असून सारं काही आलबेल असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न यातून होताना दिसत आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: