crime news today in marathi, बहिणीची छेड काढून फोटो व्हायरल करण्याची धमकी, इंजिनिअर भावाने रागाच्या भरात केलं भयंकर कृत्य - crime news today student slaps youth 70 times for harassing sister in karnataka

चिक्कबल्लापूर : शेजारच्या तरुणाने बहिणीचा सतत छळ केल्याने नाराज झालेल्या एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने शनिवारी रात्री उशिरा त्याच्यावर ७० वार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

चिक्कबल्लापूर जवळील एका कपड्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या १९ वर्षीय नंदन नावाच्या तरुणाच्या हत्येप्रकरणी अभियांत्रिकीचा विद्यार्थी दर्शन आणि त्याचा मित्र आश्रय या दोघांना चिक्कबल्लापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती.
विमानतळावर तरुणाची चेकिंग केली पण काही सापडलं नाही, अखेर अंडरवेअरमध्ये तपासलं असता पोलीस चक्रावले
पोलिस उपनिरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी आरोपींना अटक करण्यात आली. त्याने सांगितले की दर्शनने नंदनला त्याच्या १७ वर्षांच्या बहिणीपासून दूर राहण्याचा इशारा दिला होता, परंतु नंतर त्याने लक्ष दिले नाही. नंदनने मुलीचे काही फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिल्याने संतापलेल्या दर्शन आणि त्याच्या मित्राने चाकूने वार केले.

वारंवार तिच्या फोनवर कॉल करण्याचा प्रयत्न करत होता. यामुळे रागाच्या भरात दर्शनने चाकू विकत घेतला आणि पुढे हत्येचा थरार घडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात सध्या भीतीचं वातावरण आहे, तर पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.

VIDEO : लंकादहन सुरू असताना हनुमानाची भूमिका साकारणारे अचानक कोसळले, पुढे जे घडलं ते धक्कादायकच…

Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: