Congress Pratibha Dhanorkar taunts Vijay Wadettiwar over opposition leader post; हायकमांडकडून विरोधी पक्षनेतेपद कसं मिळवलं? प्रतिभा धानोरकर यांची कोपरखळी, विजय वडेट्टीवार म्हणाले...

म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर : ‘विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसमधून अनेक आमदार रिंगणात होते. मीदेखील एका इच्छुकाला हे पद मिळावे, यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र, विजय वडेट्टीवार यांनी पक्ष श्रेष्ठींकडून हे पद कसे आणले हे माझ्यासकट अनेक आमदारांना अद्याप समजले नाही,’ अशी कबुली आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दिली. यावर वडेट्टीवार यांनी प्रतिस्पर्धी इच्छुकांच्या समर्थक आमदार यादीत माझे समर्थक होते, असा खुलासा करताच सभेत हशा पिकला.

‘सत्ताधाऱ्यांवर टीका करीत असल्याने मला स्वस्थ झोपू देणार नाहीत. मात्र, कारागृहात जाण्यासाठी मी घाबरत नाही. सत्ता एकाच पक्षाकडे टिकून राहत नाही, हे लक्षात घ्यावे. राज्यात आमची सत्ता आल्यानंतर त्यांना जागा दाखवू,’ असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला.

मनोहर जोशी हा ब्राह्मण मुख्यमंत्री नको, नारायण राणेंनी घेतलेल्या ४५ आमदारांच्या सह्या: भास्कर जाधव
चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने वडेट्टीवार यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, आमदार ॲड. अभिजित वंजारी, प्रतिभा धानोरकर, सुधाकर अडबाले, काँग्रेसचे माजी अध्यक्ष विनायक बांगडे, सुभाष गौर, काँग्रेसचे शहर अध्यक्ष रामू तिवारी, नंदू नागरकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकीला स्थगिती; नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका, म्हणाले- नाईट लाईफ गँगच्या…
वडेट्टीवार म्हणाले, ‘राज्याची कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. दररोज बलात्कार, अत्याचाराच्या घटना घडत आहेत. कायदा बदलण्याची मोहीम राबविली जात आहे.’ २०२४मध्ये सत्ता परिवर्तन केले नाही, तर देशात हुकूमशाही लादली जाण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.

विजय वडेट्टीवारांच्या मनातले मुख्यमंत्री अजित पवार असावेत, नीलम गोऱ्हेंचा टोला

Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: