CJI recommends Justice D Y Chandrachud, सर्वोच्च न्यायालयात पुन्हा महाराष्ट्राला बहुमान; सरन्यायाधीश पदासाठी धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस - cji u u lalit recommends to centre name of senior-most judge justice d y chandrachud as his successor

नवी दिल्लीः न्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Justice D Y chandrachudd) हे देशाचे पुढील सरन्यायाधीश असतील. विद्यमान सरन्यायाधीश उदय लळीत यांनी केंद्र सरकारकडे त्यांच्या नावाची शिफारस केली आहे. निवृत्त होणारे सरन्यायाधीश नव्या सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस करतात. त्यानुसार लळीत यांनी चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली आहे. (CJI recommends Justice D Y Chandrachud)

विद्यमान सरन्यायाधीश न्या. लळित यांचा कार्यकाळ ८ नोव्हेंबर २०२२ रोजी संपणार आहे. त्यामुळं केंद्र सरकारने त्यांना देशाच्या पुढील सरन्यायाधीशांच्या नावांची शिफारस करण्याविषयी विचारणा केली होती. नियमांनुसार, सेवानिवृत्तीच्या एक महिना आधी भावी सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात येते.

वाचाः Domino’s Pizza खात असताना आढळले काचेचे तुकडे; संतापलेल्या ग्राहकाची थेट मुंबई पोलिसांकडे तक्रार

विद्यमान सरन्यायाधीश लळित यांच्यानंतर धनंजय चंद्रचूड हे सर्वात वरिष्ठ न्यायमूर्ती आहेत. त्यामुळं लळित यांनी चंद्रचूड यांची केंद्राकडे शिफारस केली आहे. लळित यांच्यानंतर देशाला पुन्हा एकदा देशाला मराठमोळे सरन्यायाधीश लाभणार आहे. चंद्रचूड यांचे वडील न्यायमूर्ती यशवंत चंद्रचूडदेखील सरन्यायाधीशपदी तब्बल ७ वर्ष ४ महिने अशा प्रदीर्घ काळासाठी कार्यरत होते. धनंजय चंद्रचूड यांनी मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी अलाहाबाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम केलं आहे.

वाचाः रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा एअर स्ट्राइक, किव्ह शहरावर डागली ७५ क्षेपणास्त्र, १४ जणांचा मृत्यू

उदय लळित यांनी २६ ऑगस्ट रोजी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली होती. त्यांचा कार्यकाळ केवळ ७४ दिवसांचा असून ८ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर पुढील सरन्यायाधीशांचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर २०२२ पासून १० नोव्हेंबर २०२४पर्यंत दोन वर्षांचा असणार आहे.

वाचाः चर्चगेट स्थानकात थरारनाट्य, पत्नीच्या नातेवाईकाने कानशिलात लगावली, संतापलेल्या पतीने केलं भयानक कृत्य

Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: