[ad_1]
केएफसीची फ्रँचाईझी काढून देतो असं सांगत पुण्यातील एका महिलेची तब्बल ७९ लाख ७६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी गौरव निकम, राहुल शिंदे आणि राहुल मॅथ्यू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्लिक करा आणि वाचा- दिवाळीपूर्वीच चिवडा महागला; तांदळाच्या वाढत्या दरामुळं पोहे, मुरमुरे तेजीत
घडलेल्या या प्रकाराबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला ही इस्टेट एजंट आहे. गेल्या काही दिवसांपासून ती पैशाची गुंतवणूक करण्यासाठी कंपनी शोधत होती. गौरव निकम, राहुल शिंदे आणि राहुल मॅथ्यू नामक व्यक्तींशी याच संदर्भात त्या महिलेची ओळख झाली. या तिघांनी त्या महिलेला केएफसीची फ्रँचाईजी देतो असे विश्वासाने सांगितले होते. त्यावर फसवणूक झालेल्या महिलेने विश्वास ठेवला होता.
क्लिक करा आणि वाचा- भाजपकडून झेंड्याचा अपमान; नाना पटोलेंची केंद्र सरकारवर खरमरीत टीका
त्यानंतर ठरल्यानुसार आरोपींना महिलेला ७९ लाख ७६ हजार रुपये ऑनलाइन स्वरूपात पाठवण्यास सांगितले. एका मोठ्या हॉटेलची फ्रँचाईजी मिळत आहे असं वाटल्यानं त्या महिलेनं त्यांना रक्कम देखील पाठवली. या चोरट्यांनी या महिलेला खोटी कागदपत्रंही दाखवली आणि केएफसीची खोटी वेबसाईटही बनवली होती. पैसे पाठवल्यानंतर त्या चोरट्यांनी त्या महिलेचा फोन उचलला नाही आणि कुठल्याही ई-मेलला देखील उत्तर दिले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या महिलेने पोलिसात धाव घेत या भामट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
क्लिक करा आणि वाचा- दारुमुक्त गणेशोत्सव व्हावा; खासदार गिरीश बापट यांचे आवाहन
[ad_2]
Source link