चंद्रपूर शहरातील भिवापूर वॉर्डमधील अपूर्ण मंदिरात हे देखणे शिल्प आहे. इतिहास तज्ज्ञांनी सदर शिल्प रावणाचे नसून दुर्गा मातेचे दशमुखी शिल्प असल्याचे स्पष्ट केलं आहे. इतिहासकांच्या अभ्यासानंतर व संशोधनानंतर अखेर या मूर्तीचे गुढ रहस्य समोर आलं आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. गोंडकालीन इतिहासाची साक्ष देत या वास्तू आज ही उभ्या आहेत. शहरातील भिवापूर परिसरात अपुर्ण मंदीर नावाने ओळखल्या जाणाऱ्या मंदीरात भव्य अन् देखणे शिल्प आहेत. यात दुर्गा मातेचे दशमुखी शिल्प आहे. २३ फुट उंच आणि १८ फुट रूंद अशी ही विशाल मूर्ती आहे. या मूर्तीला रावणाचे शिल्प समजून विजया दशमीच्या दिवशी दगड फेकण्यात येत होती. मात्र, हे शिल्प रावणाचे नसून दुर्गा मातेचे आहे हे समोर आल्यानंतर आता दगड मारणं बंद झाल्याचं इतिहास अभ्यासक अशोक सिंह ठाकूर यांनी सांगितले आहे.
वाचाः अनिल देशमुखांना जामीन मिळणार की नाही; उच्च न्यायालयात काय घडलं? वाचा सविस्तर
अनेक देखणे शिल्प…
याच परिसरात महिषासुरमर्दिनि, मत्स्य अवतार, कूमवितार, शिवलिंग, नंदी, हनुमान, गणेश, कालभैरव, शेषनाग आणि गरूड यांचे शिल्प आहेत. या मंदिरात असलेले ही शिल्प उपस्थितांचे लक्ष वेधून घेतात. तसंच, प्राचीन काळातील ही शिल्प असल्याने अभ्यासकही येथे भेटी देतात.
वाचाः आखाती देशांमध्ये धागेदोरे ते दहशतवादी संघटनांसोबत लागेबांधे; PFIचे सामर्थ्य कसे वाढले?; हे आहे महत्त्वाचे मुद्दे
तर भव्य मंदीर उभे असते
सोळाव्या शतकात चंद्रपूरात गोंड राजांचे साम्राज्य होते. राजा धुंड्या रामशहा यांच्या कार्यकाळात शिवभक्त रायप्पा वैश्य यांनी राज्यात भव्य मंदीर बांधण्याला सुरुवात केली होती. मात्र, रायप्पा यांचे आकस्मिक निधन झाले आणि त्यामुळं मंदिराचे बांधकाम अपुर्ण राहीले असल्याची नोंद आहे.
वाचाः शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची भव्य तयारी सुरू; अनेकांचे प्रवेश होणार, मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत