chandrashekhar bawankule baramati tour, कन्हेरी मंदिरात नारळ फोडला, पवार ५५ वर्ष हरले नाहीत, त्याच मंदिरात बावनकुळे जाणार, 'बारामती मिशन'ला सुरुवात - maharashtra bjp president chandrashekhar bawankule baramati tour over loksabha election 2024 baramati mission


बारामती : भाजपच्या ‘मिशन बारामती’ला (BJP Baramati Mission) आजपासून सुरुवात झाली आहे. भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आज बारामती दौऱ्यावर आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पवार कुटुंबियांच्या प्रचाराचा नारळ ज्या कन्हेरीच्या हनुमान मंदिरात फुटतो, त्याच मंदिरात आज चंद्रशेखर बावनकुळे जाणार आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार गेली ५५ वर्ष राजकारणात आहेत. निवडणूक कोणतीही असो, आपल्या प्रचाराचा नारळ ते कन्हेरीच्या हनुमान मंदिरात फोडतात अन् निवडणुकीच्या मैदानात उतरतात. गेल्या ५५ वर्षात पवार एकही निवडणूक हरलेले नाहीत. आज बावनकुळे कन्हेरीच्या मंदिरात जाऊन ‘बारामती मोहिम’ फत्ते करण्यासाठी बजरंगबली हनुमानाचा आशीर्वाद घेतील.

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपने आतापासूनच सुरु केली आहे. प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून बावनकुळे यांचा पुणे जिल्ह्यात पहिला दौरा आहे, तोही थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कर्मभूमी बारामतीत. भाजपने लोकसभा निवडणूक २०२४ साठी ‘मिशन ४५’ आखलं आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या ताब्यातील जागा हिसकावून घेण्यासंबंधीचं प्लॅनिंग भाजपने केलं आहे. त्यानुसार आतापासूनच भाजपने तयारी सुरु केली आहे. येत्या २२ ते २४ सप्टेंबरदरम्यान देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देखील बारामती दौऱ्यावर येत आहे. त्या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी आज बावनकुळे विशेष बैठक घेणार आहेत.

Mission Baramati : भाजपचं मिशन बारामती जोरात, बावनकुळे पवारांच्या बालेकिल्ल्यात
जिथे पवारांच्या प्रचाराचा नारळ फुटतो त्याच मंदिरात बावनकुळे जाणार!

कन्हेरीच्या मंदिरात मारुती दर्शन घेऊन बावनकुळे आपल्या दौऱ्याचा श्रीगणेशा करतील. त्यानंतर तिथून ते पवारांचं गाव असलेल्या काटेवाडीकडे कूच करतील. तिथे ते भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतील. विविध गणेश मंडळांना भेटी देऊन बाप्पाचं दर्शनही घेतील. त्यानंतर बारामती लोकसभेतल्या भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन ते त्यांना मार्गदर्शन करतील. या बैठकीला भाजपचे वरिष्ठ नेते हर्षवर्धन पाटील, वासुदेव काळे, आमदार राहुल कुल, कांचन कुल, आमदार भीमराव तापकीर आदी नेते उपस्थित असतील.

बारामती-मावळ-साताऱ्यात ताकद वाढवा, लोकसभेच्या ४५ जागा जिंकायच्या, प्लॅनिंग ठरलं : फडणवीस
भाजपचं मिशन बारामती..!

भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरु केली आहे. त्यासाठी विविध केंद्रीय मंत्र्यांवर तथा भाजप नेत्यांवर देशातल्या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याच नियोजनातून बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर देण्यात आलेली आहे. याच पार्श्वभूमीवर सीतारामन २२ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर रोजी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असतील. दुसरीकडे बारामतीचे प्रभारी म्हणून राम शिंदे यांच्यावर विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सीतारामन यांच्या दौऱ्याच्या तयारीकरिता सध्या भाजपच्या जोर बैठका सुरु आहेत.



Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: