या कथित ऑडिओ क्लीपमध्ये चंद्रकांत खैरे यांच्यावर एका अधिकाऱ्याकडून दोषारोप करण्यात आले आहेत. ऋषिकेश खैरे यांना पैसे देऊनही अपेक्षित ठिकाणी बदली न झाल्यामुळे हा अधिकारी नाराज झाला. याविषयी संबंधित अधिकाऱ्याने ऋषिकेश खैरे यांच्याशी बोलताना संतापही व्यक्त केला. या अधिकाऱ्याला वनविभागात बदली करून पाहिजे होती. परंतु, पैसे देऊनही त्याची बदली झाली नाही. त्यामुळे संबंधित अधिकारी उद्विग्न झाल्याचे दिसत आहे. बदलीसाठी दिलेले पैसे परत द्यावेत, अशी मागणीही या अधिकाऱ्याने केली. त्यावर ऋषिकेश खैरे यांनी पैसे परत देण्याचे आश्वासन दिल्याचे ऑडिओ क्लीपमध्ये ऐकायला मिळत आहे. मात्र, त्यानंतरही खैरे यांच्या पुत्राने पैसे न दिल्याने या अधिकाऱ्यानेच ही क्लीप व्हायरल केल्याचा अंदाज आहे. या ऑडिओ क्लीपमधील संभाषण पाहता ऋषिकेश खैरे यांनी पैसे घेतल्याचे सिद्ध होत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. त्यामुळे चंद्रकांत खैरे आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश खैरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यावर आता चंद्रकांत खैरे काय प्रत्युत्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
ऑडिओ क्लीपमध्ये नेमंक काय म्हटलंय?
ऋषी खैरे: हॅलो
विजय: बोला भाऊ
ऋषी खैरे: कुठे आहे तू…
विजय: इकडे शेंद्राला होतो
ऋषी खैरे: आ…
विजय: शेंद्राला
ऋषी खैरे: अच्छा, काळेचा फोन आला होता, काय झाले
विजय: अरे हौ ना, तुम्ही दोघेपण ह्ल्क्यातच घेऊ लागले, एवढी परेशानी चालू आहे माझी, दोन अडीच वर्षे झाले पैसे देऊन, दोन लाख रुपये..काय बोलणार आहे बरं तुम्हाला, विशाल देखील काही रिस्पॉन्स देत नाही..तुम्ही रिस्पॉन्स देऊ नाही राहिले
ऋषी खैरे: आज काय तारीख आहे, २३ तारीख आहे…पहिल्या आठवड्यात देऊन टाकतो
विजय: आता लय वेळीस सांगितले न तुम्ही, किती वेळेस भेटलो. तेथून आता इथे आलो होतो.
ऋषी खैरे: हंड्रेड पर्सेंट होईल
विजय: तुम्हाला माहित आहे का भाऊ, मी घरातील सोने चांदी देखील मोडले आहे, आता एवढी परेशानी चालू आहे. तुम्ही लोकांनी फोन उचलले नाही, काय करायचं बरं सांगा तुम्ही..माझं काम देखील नाही झाले बदलीचे, नंतर दीड-दोन वर्षे देखील वाया गेले माझे
ऋषी खैरे: डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुझं काम करून देतो किंवा पैसे देतो
विजय: नै काम करूच नका, काम करून घेतो मी, आता लोकांना परत पैसे देऊन बसलो आहे मी, तिकडे बदलीसाठी
ऋषी खैरे: अच्छा दिलेले आहे का?
विजय: हो…
ऋषी खैरे: पैसे देऊन टाकतो
विजय: तुम्ही तारीख सांगा भाऊ एक फिक्स, खरच लय परेशानी चालू आहे माझी
ऋषी खैरे: डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात देऊन टाकतो
विजय: लास्ट तारीख आठ पकडू का मी…
ऋषी खैरे: होय…
विजय: बरं ठीक आहे चालेल..