burning bike video on whatsapp status, हॉटेलमध्ये तोडफोड, बाईकही पेटवली, जळत्या दुचाकीचा व्हिडिओ स्टेटसवर टाकून लिहिलं... - maharashtra crime news aurangabad hotel vandalize fire video of burning bike on whatsapp status

औरंगाबाद : ‘यहा धंदा कैसे करता है?’ असे म्हणत आरोपीने अगोदर हॉटेलची तोडफोड करत तरुणाला मारहाण केली. त्यानंतर मध्यरात्री त्याच्या घरासमोरील दुचाकीची पेट्रोल नळी उघडून पेटवली आणि घराचा दरवाजा देखील जाळण्याचा प्रयत्न केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर पेटवलेली बाईक आगीत धगधगत असतानाचा व्हिडिओ बनवून स्वतःच्या स्टेटसवर ठेवला.

ही धक्कादायक घटना औरंगाबदेतील रशीदपुरा भागात समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेख नासेर उर्फ इंता (रा.आलमगिर कॉलोनी, औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, शेख मोहम्मद आमेर चांद (वय २१ वर्ष, रा. रशीदपुरा, औरंगाबाद) यांचे सलीम अली सरोवर परिसरात हॉटेल आहे. संध्याकाळी आरोपी इंता हा हॉटेलवर आला व त्याने मोहम्मद यांना ‘तू यहा पे धंदा कैसे करता’ असे म्हणत हॉटेलची तोडफोड करायला सुरुवात केली आणि त्याला मारहाणही केली.

या तोडफोडीत हॉटेलचे सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान आरोपीने केल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर आरोपी इंता एवढ्यावरच न थांबता त्याने मध्यरात्री मोहम्मद यांचं घर गाठलं. घरासमोर उभी केलेली (एम.एच.२० डी.जे.९२३२) दुचाकीची पेट्रोल नळी काढून ती पेटवली व मोहम्मद यांच्या घराच्या दरवाज्यालाही पेटवून देण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा : बिबट्याचा हल्ला नाही, पत्नीला शिट्टी मारल्याने शेजाऱ्याने संपवलं, औरंगाबादेतील गूढ उकललं

आवाज झाल्याने मोहम्मद झोपेतून उठले. त्यांनी इंताला जाब विचारला असता तो जीवे मारण्याची धमकी देत पसार झाला. काही वेळाने मोहम्मद यांच्या जाळलेल्या दुचाकीच्या व्हिडिओवर ‘जलवा है हमारा’ असं स्टेटस ठेवलं. या प्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक गिरी करित आहेत.

हेही वाचा : जागेच्या वादातून पांढरकवडा स्मशानभूमीसमोर हल्ला, चुलत भावाचा मृत्यू, काका गंभीर

Source link

By jaghit