boy lighting firecrackers rocket, उल्हासनगरात माथेफिरुने लोकांच्या घरात रॉकेट सोडले, VIDEO पाहून धक्का बसेल - ulhasnagar boy lighting firecrackers rocket towards building goes straight into homes shocking viral video of diwali night

उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये एका माथेफिरूने एका रहिवासी इमारतीवर मध्यरात्रीच्या सुमारास फटाक्यांचे रॉकेट डागल्याची घटना घडली. हे रॉकेट्स थेट नागरिकांच्या घरात जाऊन फुटल्याने नागरिकांमध्ये मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाहा हा धक्कादायक व्हिडिओ –

हेही वाचा – धक्कादायक! बसवलिंग स्वामी त्यांच्या खोलीत मृतावस्थेत आढळले, वर्षभरात मठाच्या दुसऱ्या गुरुचा मृत्यू

उल्हासनगरच्या गोल मैदान परिसरात हिरापन्ना अपार्टमेंट नावाची इमारत आहे. या इमारतीवर सोमवारी पहाटे सव्वादोन ते अडीचच्या सुमारास एका अज्ञात माथेफिरूने फटाक्यांचे रॉकेट सोडले. इमारतीच्या बाहेर हातात रॉकेटचा बॉक्स घेऊन हा माथेफिरू उभा होता आणि त्यातून सुटणारे रॉकेट्स थेट नागरिकांच्या बाल्कनीवर हा माथेफिरू सोडत होता.

हेही वाचा –धनत्रयोदशीला महाराष्ट्राला मुघलकालीन खजिना सापडला, खड्डा खोदताना घबाड हाती

हे रॉकेट्स नागरिकांच्या घरात जाऊन फुटत होते. या माथेफिरूच्या साथीदाराने या घटनेचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला. या घटनेमुळे हिरापन्ना इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण पसरलं. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात सोमवारी २४ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या अज्ञात माथेफिरूचा शोध घेत आहेत.

हात लावून दाखवा ,पोलिसांना नडली,काचा फोडल्या, सोलापूर रेल्वे स्थानकात माथेफिरू कॉलेज तरूणीचा राडा

Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: