atrocity case filed against college professor, 'त्या' प्राचार्यांवर अखेर अॅट्रोसिटीचा गुन्हा; विद्यार्थ्यांचा जातिवाचक उल्लेख, अश्लील भाषेचा वापर - fir against government college principal over caste-based alligation

[ad_1]

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतील शासकीय अध्यापक कॉलेजच्या प्राचार्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अनेकदा असंसदीय, अश्लील आणि जातिवाचक भाषेचा वापर करत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. याप्रकरणी आझाद मैदान पोलिस ठाण्यात प्राचार्यांविरुद्ध अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईतील शासकीय अध्यापक कॉलेजच्या प्राचार्य डॉ. उर्मिला परळीकर यांच्याकडून कॉलेजात अनेक दिवसांपासून सातत्याने अनावश्यक कारणांवरून विद्यार्थ्यांशी असंसदीय, अश्लील व जातिवाचक भाषेचा वापर करत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. प्राचार्य छोट्या छोट्या कारणांवरून विद्यार्थ्यांच्या मानात भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न करत असल्याचे विद्यार्थ्यांनी तक्रारीत म्हटले आहे. प्राचार्यांनी कॉलेजमध्ये नुकतेच एक सर्वेक्षण केले होते. यामध्येही अश्लील प्रश्न विचारल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. तसेच वर्गात मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा उल्लेख त्यांच्या जातीवरून करून हीन वागणूक देत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या सर्वांची तक्रार विद्यार्थ्यांनी एनएसयूआय, कॉप्स अशा विद्यार्थी संघटनांकडे केली होती. यानुसार या संघटनांनी आझाद मैदान पोलिस ठाण्यात निवेदन दिले. यानंतर विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरून प्राचार्यांविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी विद्यार्थ्यांसोबत ‘एनएसयूआय’चे उपाध्यक्ष फैजल शेख, कॉप्स विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड, युवक अध्यक्ष अलोक कनोजिया आणि महिला अध्यक्ष प्रियंका हाटे उपस्थित होते. २५हून अधिक विद्यार्थ्यांनी ही तक्रार नोंदविल्याचे एकाड यांनी सांगितले. याप्रकरणी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तत्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी आमची मागणी असल्याचे फैजल शेख यांनी सांगितले.

दरम्यान, याप्रकरणी प्राचार्य डॉ. परळीकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.

[ad_2]

Source link

By jaghit