amravati teacher molested girl student, शिक्षकी पेशाला काळीमा, गुरुजींकडून विद्यार्थिनीचा विनयभंग, अमरावतीतील धक्कादायक घटना... - amravati teacher molested girl student who is 17 year old young by saying lets be in relationship case filed against him

अमरावती: शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं हे पवित्र आहे. आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी शिक्षक प्रयत्नांची पराकाष्टा करतात. मात्र, याच पवित्र नात्याला काळीमा फासत एका ४० वर्षीय शिक्षकाने आपल्यापेक्षा १७ वर्ष लहान असलेल्या विद्यार्थिनीला ‘चल आता आपण रिलेशनमध्ये येऊ’, असं म्हणत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जिल्ह्यातील मोर्शी येथील प्रवीण श्रीकृष्णराव धोटे असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. या १६ वर्षीय विद्यार्थिनीने आरोपी शिक्षकाविरुद्ध पोलीस ठाण्यात धाव घेतली असून त्याच्यावर सध्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा –बहिणीला मेसेज करुन अल्पवयीन मुलीचा टोकाचा निर्णय, सारं गाव सुन्न, कारण…

आरोपी हा पेशाने शिक्षक आहे. विद्यार्थिनी वरुड येथील एका शाळेत शिक्षण घेत असताना तिची या शिक्षकासोबत ओळख झाली. दरम्यान, आरोपीने तिचं अॅडमिशन अमरावती येथील एका महाविद्यालयात करुन दिलं त्यामुळे दोघांमधील संवाद आणि विचारांची देवाण-घेवाण वाढली. दरम्यान, शिक्षकाने या संवादाचा चुकीचा अर्थ लावत थेट तिला चल आपण रिलेशनमध्ये राहू, असा आग्रह धरला. या शिक्षकाच्या कृत्याला कंटाळून त्या विद्यार्थिनीने थेट पोलीस ठाणे गाठले.

हेही वाचा –भजी खाताना क्षुल्लक कारणावरुन वाद, मग त्याने ऑम्लेटच्या दुकानातून चाकू उचलला अन् मित्राचा अंत

आरोपी शिक्षकाने तिला कॉल केला आणि म्हटलं की, आपल्यातील शिक्षक आणि विद्यार्थिनीचे नाते आता संपवून टाकू, मला तुझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहायलाचे आहे. तू मला खूप आवडतेस, तुझ्यासोबत बोलायचे आहे. त्यानंतर या शिक्षकाने कॉल, वारंवार मेसेज, व्हाट्सअॅप चॅट करुन या तरुणीचा विनयभंग केल्याची घटना सुद्धा नमूद करण्यात आली आहे.

हेही वाचा –ड्रग्ज तस्करीसाठी भारतीय महिलांशी लग्न, दिल्लीत मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबई कनेक्शन उघड

पतीच्या पुण्याईमुळेच सकारात्मक निर्णय, न्यायालयाच्या निकालानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया

Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: