aditya thackeray shivsena, आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच जळगावमध्ये तणाव; बॅनर फाडल्याने शिवसैनिकांमध्ये संताप - banners torn down in jalgaon ahead of shivsena aditya thackerays visit


जळगाव : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मात्र त्यांचा दौरा सुरू होण्यापूर्वीच जळगावात शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे समर्थक आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. धरणगावातील प्रवेश मार्गावर लावण्यात आलेले आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर अज्ञात व्यक्तींनी फाडल्याची घटना मध्यरात्री घडली. त्यामुळे परिसरात राजकीय तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा आज जळगाव जिल्ह्यात येत आहे. पाचोरा, धरणगाव, पारोळा येथील शिवसेना बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात आदित्य यांच्या सभा होणार आहेत. ते आज धरणगावात ज्या मार्गाने जाणार आहेत त्याच मार्गावरील बॅनर फाडल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. अज्ञातांकडून शहरातील गणेश नगर, हेडगेवार नगर आणि उड्डाण पुलाजवळ पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे बॅनर फाडल्याचा प्रकार समोर आला आहे.

मुख्यमत्र्यांचे अभिनंदन करणारे होर्डिंग, बॅनर न काढण्यासाठी आदेश? प्रकरण पोहोचलं कोर्टात

राजकीय द्वेषातून शिवसेना, युवासेनेचे स्वागत बॅनर फाडल्याचा संशय शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे. या घटनेनंतर शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे.

मुंबईला ६ जण उडवणार, पाकिस्तानहून पोलिसांच्या व्हॉट्सॲपवर मेसेज; वाचा काय लिहलं

दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल खताळ व कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी उपनगराध्यक्ष देविदास बापू महाजन, नगरसेवक वासुदेव चौधरी, भागवत चौधरी, किरण अग्निहोत्री, रविंद्र जाधव, भरत माळी आदी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सूचना दिल्या.



Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: