Maharashtra Politics | वंचित बहुजन आघाडी लवकरच महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षासोबत युती करण्याचा निर्णय घेतला होता. या युतीविषयी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस त्यांची समजूत कशाप्रकारे काढणार, हे पाहावे लागेल.
हायलाइट्स:
- जोगेंद्र कवाडे यांना सोबत घेण्यापूर्वी आमच्याशी चर्चा करणे, अत्यंत आवश्यक होते
- नवीन येणाऱ्या लोकांचे स्वागत आहे
- मला न विचारता थेट घोषणा केली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांना सोबत घेण्यापूर्वी आमच्याशी चर्चा करणे, अत्यंत आवश्यक होते. महायुतीत कुणाला घ्यायचे आहे, कोणत्या पक्षाला घ्यायचे आहे हा महायुतीचा निर्यण असतो. नवीन येणाऱ्या लोकांचे स्वागत आहे. परंतु, आपल्याला विचारामध्ये न घेता थेट घोषणा करण्यात आली हे योग्य नाही, अशी भावनाही रामदास आठवले यांनी बोलून दाखवली.
काही दिवसांपूर्वीच वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई महानगरपालिकेत ठाकरे गट आमच्यासाठी सोडेल तितक्या जागांवर आम्ही लढू, असे जाहीर केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे गट आणि वंचितची युती जवळपास निश्चित मानली जात आहे. प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्याला काही तास उलटत नाही तोच एकनाथ शिंदे यांनी जोगेंद्र कवाडे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी जोगेंद्र कवाडे यांचे कौतुक केले होते. कवाडे हे अभ्यासू आणि आक्रमक नेते आहेत, अशी स्तुतीसुमनेही एकनाथ शिंदे यांनी उधळली होती. मात्र, यामुळे रामदास आठवले नाराज झाले आहेत.
रामदास आठवले हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपसोबत आहेत. भाजपने केंद्रात राज्यमंत्रिपद देऊन रामदास आठवले यांचा उचित सम्मानही केला होता. परंतु, आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आंबेडकरी चळवळीचा वारसा सांगणाऱ्या आणखी एका पक्षाचा समावेश झाल्याने रामदास आठवले हे काहीसे अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळेच त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. तेव्हा आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस त्यांची समजूत कशाप्रकारे काढणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
वंचित बहुजन आघाडी लवकरच महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षासोबत युती करण्याचा निर्णय घेतला होता. या युतीविषयी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस त्यांची समजूत कशाप्रकारे काढणार, हे पाहावे लागेल.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.