परंतु डहाणूचे आमदार विनोद निकोले हे संपूर्ण अधिवेशनाचा कार्यकाळ संपत नाही तोपर्यंत आमदार निवासमध्ये राहतात. आमदार निवास ते विधानभवन हा प्रवास ते चक्क ‘ई-रिक्षा’तून करतात. विनोद निकोले यांनी मुंबई ते नागपूर प्रवास देखील रेल्वेने केला आहे. रिक्षातून प्रवास करताना अनेक अडथळे देखील येतात चौका-चौकात पोलिसांकडून थांबवण्यात येते. आमदार असल्याचे सांगितले तरी देखील रिक्षा आतमध्ये सोडली जात नाही. आकाशवाणी चौकातून विधानभवन हे अंतर ८०० मीटर आहे. हे अंतर आमदार पायी चालत जातात.
अजित पवार म्हणाले, राज्याच्या अस्मितेला ठेच, फडणवीस म्हणाले, दादा मुंबई आपलीच, कुणाच्या बापाची नाही!
आमदार विनोद निकोले हे कोण आहेत?
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभेचे विनोद निकोले हे आमदार आहेत. डाव्या चळवळीचे काम करताना पक्षाने कामगार नेत्याची जबाबदारी विनोद निकोले यांचावर सोपवली. चळवळीचे काम करत असताना २०१९ विधानसभा निवडणुकीत विनोद निकोले यांना उमेदवारी देण्यात आली. यावेळी डहाणू मतदार संघात भाजपचे स्व. पास्कल धनारे हे आमदार होते. त्यांच्या विरोधात विनोद निकोले ६ हजार मतांची आघाडी घेत एकूण ७२ हजार मतांनी निवडून आले. विनोद निकोले यांची कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय नव्हती. त्यांचे आई-वडील हे शेतमजूर आहेत. अजून देखील ते डहाणूमध्ये आपली शेती करून उदरनिर्वाह करत आहेत.
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना विनोद निकोले हे आमदार झाले आणि आपल्या परिस्थितीची जाण ठेवत विनाकारण खर्च न करण्यावर त्यांनी जास्त भर दिलेला आहे. त्यांना मिळणाऱ्या मानधनातून तब्बल ७०% रक्कम ही पक्षाला दिली जाते. त्यामुळे सध्या तरी किंवा पुढील काही वर्षांमध्ये गाडी न घेण्याचा निर्णय आमदार विनोद निकोले यांनी केला आहे.
Heeraben Modi Admitted: नरेंद्र मोदींच्या आई हिराबेन यांची प्रकृती बिघडली; पंतप्रधान अहमदाबाद