youth suspected of witchcraft killed, बायकोवर जादूटोणा केल्याचा संशय, तरुणाला रस्त्यात गाठत संपवलं; भर चौकात सर्वांसमोर भयंकर थरार - the husband killed the young man on suspicion of witchcraft on his wife

यवतमाळ : जादूटोणा केल्याच्या संशयावरून शेजाऱ्यांनी एका तरुणावर धारदार चाकूने हल्ला चढवत त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात संबंधित तरुणाच्या मांडीवर आणि गुप्तांगावर वार केल्याने तो जागीच रक्ताच्या थारोळ्या कोसळला आणि काही क्षणात त्याचा मृत्यू झाला. ही गंभीर घटना २५ डिसेंबरला रात्री ९ वाजताच्या सुमारास सुभाष चौकात घडली. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे.

अमोल तुकाराम धुळे (वय ३५) असे हत्या झालेल्या तरुणाचे तर रमेश वसंतराव पवार ( वय ३८) असे आरोपीचे नाव आहे. हे दोघेही येथील शिवाजी वार्डात एकमेकांच्या शेजारी राहतात. अमोल हा आपल्या पत्नीवर जादूटोणा करतो, असा संशय मारेकरी रमेशला होता. यातूनच अनेकदा या दोघांमध्ये वाद देखील झाले. दरम्यान, २५ डिसेंबरच्या रात्री अमोल हा नेहमीप्रमाणे कापड दुकानातून काम करून घराकडे परतत होता. त्याच्या मागावर असलेल्या मारेकरी रमेशाला तो सुभाष चौकात दिसला. यावेळी कुठलाही विचार न करता भर चौकात आरोपी रमेशने अमोल वर धारदार चाकूने हल्ला चढवला.

वॉर्नरची अद्वितीय कामगिरी! १०० व्या कसोटीत द्विशतक; इतिहास घडवताच मैदानाबाहेर गेला, पाहा VIDEO

या हल्यात गुप्तांगावर आणि मांडीवर चाकूचे वार करत अमोल जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. एवढेच नाही तर काही क्षणात तो जागीच ठार झाला. त्यानंतर मारेकरी रमेश घटनास्थळावरुन पसार झाला. हत्या झाल्याचे लक्षात येतात बघ्यांची गर्दी उसळली या घटनेची माहिती मिळताच पुसद शहर ठाणेदार दिनेश शुक्ला हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाची बारकाईने तपासणी करून पंचनामा केला. त्यानंतर अमोलचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. शिवाय मारेकरी रमेश पवार याच्याविरुद्ध भांदवी ३०२ कलमायान्वये गुन्हा दाखल केला आहे.

मारेकऱ्याला तासाभरात ठोकल्या बेड्या…

भर चौकात अमोलची हत्या केल्यानंतर मारेकरी रमेश घटनास्थळावरुन पसार झाला. या घटनेची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी तातडीने तपास चक्र फिरवून मारेकरी रमेशचा शोध घेतला. तसेच त्याला तासाभरात शिवाजी वार्ड परिसरातून बेड्या ठोकण्यात आल्या. या कारवाईत फौजदार राजू खांदवे, जमादार जलाल शेख, शिपाई भगत आकाश बाभुळकर आदींचा सहभाग होता.

मुख्यमंत्री कुठे आहेत? अजित पवारांच्या प्रश्नावर फडणवीसांचं चलाख उत्तर, पण दादांनी ‘टायमिंग’

Source link

By jaghit