[ad_1]
माणसाच्या जीवनात अनेक चढ-उतार असतात. यामध्ये कधी दुःख असते तर कधी सुख. आचार्य चाणक्य यांनी दैनंदिन आयुष्याशी निगडित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही अतिशय उपयुक्त ठरतात. त्यांनी सांगितलेल्या नीती आपल्याला वाईट काळात मदत करू शकतात. एखाद्या परिस्थितीत आपले वर्तन कसे असावे यावर त्यांनी विस्तृत माहिती दिली आहे. चाणक्य म्हणतात की वाईट परिस्थितीमध्ये शहाणपणाने काम केले तर प्रत्येक संकट टाळता येते. चाणक्या यांनी संकटातून बाहेर पडण्यासाठी सापासारखे वागण्यास सांगितले आहे. त्यांनी असे सांगितले ते जाणून घेऊया.
\
आचार्य चाणक्य म्हणतात, ‘साप जरी विषारी नसला तरी तो फुत्कारणे थांबवत नाही, त्याचप्रमाणे दुर्बल माणसाने कठीण काळात आपला अशक्तपणा दाखवू नये.’
- आचार्य चाणक्य यांच्या मते, यशस्वी व्यक्तीने कधीही आपली कमजोरी कोणालाही सांगू नये. कारण तुम्ही तुमची कमजोरी इतरांना सांगितल्यास ते तुमचा गैरफायदा घेऊ शकतात.
- चाणक्य यांनी सांगितले आहे की, सापाचे विष काढून टाकले तरी त्याचे फुत्कारणे थांबत नाही. त्याच्या या वागण्यामुळे शत्रू हल्ला करण्यापूर्वी नीट विचार करतो. त्याचप्रमाणे, एखादी व्यक्ती दुर्बल असली तरीही तिने ही स्थिती इतरांसमोर प्रदर्शित करू नये. तुम्ही इतरांसमोर खंबीरपणे उभे राहिल्यास तुमचे विरोधक तुमचे नुकसान करू शकत नाहीत.
- जेव्हा अनेक समस्या एकत्र घेरतात, तेव्हा व्यक्ती आपल्या मनातील गोष्ट इतरांना सांगते, कारण त्यावेळी तो स्वतःशी लढत असतो आणि त्याच्या भावना हाताळणे त्याच्यासाठी कठीण होते. यामुळेच तो आपले दुःख इतरांना सांगतो. अनेक लोक तुमच्या याच परिस्थितीचा फायदा घेतात. या परिस्थितीत, जे तुमचे खरे मित्र आहेत त्यांच्यासमोरच तुमचे मन मोकळे करा. खरे मित्र प्रत्येक सुख-दु:खात साथ देतात आणि तुम्हाला प्रेरित करतात.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)
[ad_2]
Source link