Weekly Horoscope 17-23 October 2022


१७ तारखेपासून ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. हा आठवडा सर्वच राशींसाठी अतिशय खास ठरणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार काही राशींच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ सिद्ध होऊ शकतो, तर काहींना या आठवड्यात आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. हा आठवडा सर्व राशींसाठी कसा सिद्ध होणार आहे हे जाणून घेऊया.

या आठवड्यात एका लहान प्रवासाची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या आणि तणावाची तसेच, आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल. आठवड्याच्या शेवटी परिस्थिती सुधारू शकते. धनलाभ होण्याची संभावना आहे.

या आठवड्यात आरोग्य आणि मनाची स्थिती सुधारू शकते. कामाचा ताण कमी होण्यासह कर्जातून मुक्त होण्यासही मदत होऊ शकते. पैसा आणि करिअरची स्थिती ठीक राहील. कुटुंबात शांतता आणि संयम ठेवून वाद टाळण्याचा प्रयत्न करावा. या आठवड्यात आरोग्याची काळजी घ्यावी.

या आठवड्यात आर्थिक स्थिती सुधारू शकते. करिअरमधील समस्या हळूहळू सुटू शकतात. मात्र कामाचे थोडे दडपण राहू शकते. शिक्षण आणि स्पर्धांच्या बाबतीत कठोर परिश्रम करावे लागतील. आठवड्याच्या शेवटी महत्त्वाच्या प्रवासाची शक्यता आहे.

Guru Margi 2022 : २४ नोव्हेंबरनंतर सर्वच राशींचे दिवस पलटू शकतात; काहींना मिळणार शुभ वार्ता, तर काहींच्या अडचणीत होणार वाढ

आठवड्याच्या सुरुवातीला तणाव जाणवू शकतो. करिअर आणि नातेसंबंधात अडचणी येण्याची संभावना आहे. मात्र, तुम्ही हुशारीने परिस्थिती हाताळू शकता. आठवड्याच्या मध्यापासून पैसा आणि करिअरची स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. मात्र एखादी भावनिक समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते.

आठवड्याच्या सुरुवातीला लाभाची शक्यता आहे. करिअर आणि कर्जाची स्थिती सुधारू शकते. आरोग्याची काळजी घ्यावी. कौटुंबिक सदस्याबाबत काही चिंता सतावू शकते. या आठवड्यात आपला स्वभाव आणि बोलणे सांभाळावे.

आठवड्याच्या सुरुवातीला आरोग्य आणि मानसिक स्थिती सुधारू शकते. करिअर आणि पैशातील अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्ही नवीन कामाचा विचार करू शकता. घाईघाईने काम करणे आणि निर्णय घेणे टाळावे. आठवड्याच्या शेवटी वादविवाद टाळण्याचा प्रयत्न करावा.

आठवड्याच्या सुरुवातीला प्रवासाचे योग बनत आहेत. कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि धावपळ वाढू शकते. आरोग्य चांगले राहून धनलाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. या आठवड्यात कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याबाबत समस्या निर्माण होऊ शकतात.

या आठवड्यात आरोग्य आणि मानसिक स्थितीकडे लक्ष द्यावे लागू शकते. मात्र, हळूहळू परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. एकूणच करिअरची स्थिती चांगली राहील. सप्ताहाच्या शेवटी वाहन किंवा मालमत्तेचा लाभ होण्याची संभावना आहे.

आठवड्याच्या सुरुवातीला लाभदायक प्रवास होण्याची शक्यता आहे. व्यस्तता वाढेल, परंतु प्रत्येक परिस्थितीत फायदा होऊ शकतो. करिअरमध्ये काही सुधारणा होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात आरोग्याची काळजी घ्यावी. कौटुंबिक वाद आणि धनहानी यापासून स्वतःला लांब ठेवण्याचा प्रयत्न करावा.

Shani Transit : २०२३ मध्ये वाढणार ‘या’ राशींची चिंता; करावा लागू शकतो शनिच्या साडेसातीचा सामना

आठवड्याच्या सुरुवातीपासूनच मानसिक चिंता दूर होण्याची संभावना आहे. करिअर आणि पैशाची स्थिती सुधारू शकते. नवीन कामांना सुरुवात करू शकता. वाद टाळण्याच्या प्रयत्न करावा.

आठवड्यात कामाचा ताण राहू शकतो. परंतु आठवड्याच्या मध्यापासून स्थिती सुधारू शकते. शैक्षणिक स्पर्धेच्या बाबतीत यश मिळण्याची शक्यता आहे. विवाहाशी संबंधित गोष्टी मार्गी लावण्यासाठी ही योग्य वेळ सिद्ध होऊ शकते.

आठवड्याच्या सुरुवातीला मन अस्वस्थ होऊ शकते. करिअर आणि कौटुंबिक बाबींमध्ये तणाव वाढू शकतो. आठवड्याच्या मध्यापासून हळूहळू सुधारणा होण्याची संभावना आहे. आरोग्य सुधारू शकते. या आठवड्यात मित्र किंवा शिक्षकाची मदत लाभदायक सिद्ध होऊ शकते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: